Rajesh Kshirsagar
Rajesh KshirsagarSarkarnama

आमची मर्दाची पद्धत..! क्षीरसागरांचा पहिला वार चंद्रकांतदादांवर

कोल्हापूर उत्तरच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेनेत वाद निर्माण झाला होता.
Published on

नागपूर : कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीवरून काँग्रेस (Congress) आणि शिवसेनेत (Shivsena) वाद निर्माण झाला होता. ही जागा काँग्रेसला सोडल्याने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) हे नाराज झाले होते. अखेर क्षीरसागर यांनी तलवार म्यान केली आहे. काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारात ते सक्रिय झाले आहेत. प्रचारात त्यांनी पहिला वार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर केला आहे.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा उमेदवारी अर्ज भरण्यास जाण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैठक झाली. या बैठकीत बोलताना क्षीरसागर यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, पाठीमागून वार करण्याची सवय शिवसेनेला कधीच नाही. शत्रूला अंगावर घेऊन समोरून वार करुन हरविण्याची आमची मर्दाची पध्दत आहे. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांना शिवसैनिक विजयी करुन दाखवतील.

Rajesh Kshirsagar
प्रवीण दरेकरांना न्यायालयाचा दिलासा; तूर्तास अटक टळली

मुख्यमंत्री ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावून राजेश क्षीरसागर यांची नुकतीच मनधरणी केली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर माध्यमांंशी बोलताना क्षीरसागर म्हणाले होते की, पुढच्या पाच वर्षांतही हीच आघाडी सत्तेत असणार आहे. एकही शिवसैनिक भाजपला मतदान करणार नाही. भाजपकडून शिवसेनेच्या डोक्यावर पाय देण्याचे काम सुरू आहे. तुम्हाला राज्यात मोठं केलं त्याच हिंदुत्ववादी पक्षाच्या डोक्यावर तुम्ही पाय ठेवत आहात. शिवसैनिक हे कदापी विसरणार नाहीत. या निवडणुकीत शिवसैनिक मोठ्या ताकदीनं, मोठ्या जिद्दीनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा जास्त ताकदीनं उतरुन या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करतील"

Rajesh Kshirsagar
अखिलेश यादवांचा तडकाफडकी राजीनामा अन् म्हणाले, हा त्याग आवश्यकच!

कोल्हापूर उत्तरची निवडणूक लढवण्याची इच्छा स्थानिक शिवसैनिकांनी व्यक्त केली होती. पण शिवसेनेने काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना पाठिंबा द्यायचे ठरविले आहे. यामुळे काँग्रेसच्या जयश्री जाधव या आता महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. उत्तर मतदारसंघातून शिवसेनेकडून राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी मिळावी, असा आग्रह स्थानिक शिवसैनिकांनी धरला होता. अखेर क्षीरसागर यांनी त्यांची तलवार म्यान केली आहे. ही लढत पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिष्ठेची केली आहे. यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचे लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com