प्रवीण दरेकरांना न्यायालयाचा दिलासा; तूर्तास अटक टळली

विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) हे अडचणीत आले आहेत.
Pravin Darekar News
Pravin Darekar NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : भाजप (BJP) नेते आणि राज्याचे विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) हे अडचणीत आले आहेत. दरेकरांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला आहे. यावर न्यायालय 25 मार्चला निर्णय सुनावणार आहे. न्यायालयाने तोपर्यंत दरेकरांना दिलासा दिला असून, त्यांना अटकेपासून संरक्षण कायम ठेवले आहे. यामुळे दरेकरांची अटक सध्या टळली आहे. (Pravin Darekar News)

मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai High Court) दिलासा न मिळाल्याने दरेकरांना अटक होण्याची शक्यता आहे. मजूर प्रकरणी दाखल गुन्ह्यात अटक न करण्याची दरेकर यांची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर दरेकरांनी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली. त्यांच्या जामीन अर्जावरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला आहे. न्यायालय २५ मार्चाल फैसला सुनावणार आहे. तोपर्यंत न्यायालयाने दरेकरांना दिलेले अटकेपासूनचे संरक्षण कायम राहणार आहे.

Pravin Darekar News
अखिलेश यादवांचा तडकाफडकी राजीनामा अन् म्हणाले, हा त्याग आवश्यकच!

मुंबै बँकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणूक लढवणारे भाजप नेते प्रवीण दरेकर अडचणीत आले आहेत. या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर यांनी मजूर प्रवर्गातून अर्ज भरला होता. याला आक्षेप घेत तक्रार दाखल करण्यात आली होती. सहकार विभागाने याची चौकशी करुन दरेकरांना अपात्र ठरवले होते. मजूर म्हणून प्रवीण दरेकर हे सदस्यत्वाला अपात्र असल्याचे सहकार विभागाने म्हटले होतं.

Pravin Darekar News
धामी ठरले 'बाजीगर'! मोदी-शहांच्या उपस्थितीत सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाचा मान

कामगार असल्याचा दावा करून दरेकर हे 1999 मध्ये कामगार सहकारी संस्थेचे सदस्य झाले. त्यांनी 2016 मध्ये विधान परिषद निवडणुकीपूर्वी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे 2.3 कोटी रुपयांची मालमत्ता होती. त्यांच्याकडे 2.5 लाख रुपयांच्या मासिक उत्पन्नासह 91 लाख रुपयांची रोकड होती. यावरून ते मजूर नसल्याचे दिसून येते, असेही सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दरेकरांनी उत्पन्नाचे साधन म्हणून स्वतंत्र व्यवसाय असे नमूद केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com