Vasant More : 'येडे चाळे करू नका, तुमच्या अड्ड्यावार एकटाच आलोय', तात्यांनी थेट भाजप आमदाराला इशाराच दिला

vasant more warns yogesh tilekar : महापालिका आयुक्त आणि भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी कात्रज चौकात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता.
vasant more
vasant moresarkarnama
Published on
Updated on

Pune News : कात्रज कोंढवा रस्त्याच्या कामावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे आणि भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला असल्याचं पाहायला मिळत आहे. या संघर्षामध्ये वसंत मोरे (Vasant More) यांनी, 'येडे चाळे करू नका, तुमच्या अट्ट्यावर एकटाच आलोय', असं म्हणत अप्रत्यक्षपणे भाजप आमदार टिळेकर (Yogesh Tilekar) यांना इशारा दिला आहे. (Vasant More slams BJP MLA Yogesh Tilekar over Katraj Kondhwa road work)

महापालिका आयुक्त आणि भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी कात्रज चौकात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे काम पाहण्यासाठी आयुक्त आणि आमदार येणार असल्याने या पाहणी दौऱ्या दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वसंत मोरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आली.

यावेळी आमदार योगेश टिळेकर यांच्याविरोधात वसंत मोरे आणि कार्यकर्त्यांनी निदर्शने करत 'स्टंटबाजी बंद करा', 'कात्रज कोंढवा रस्ता' पूर्ण करा, असे फलक दर्शवले. तसेच यावेळी अधिकाऱ्यांना नागाची प्रतिकृती सुद्धा उपहासात्मक भेट दिली. यादरम्यान योगेश टिळेकर आणि वसंत मोरे हे आमने-सामने आल्याचे पाहिला मिळालं या दोघांमध्ये शाब्दिक चकमक देखील उडाल्याचे पाहायला मिळालं.

vasant more
Vasant More Vs Yogesh Tilekar : भाजप आमदारांना नडले ठाकरेंचे 'तात्या'! आता थेट 30 सहकाऱ्यांवर गुन्हा

त्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा वसंत मोरे आणि त्यांच्या 20 ते 25 सहकाऱ्यांनी विरोधात परवानगी शिवाय आंदोलन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही नेत्यांमधील संघर्ष मोठ्या प्रमाणात पेटला आहे. कात्रज चौकामध्ये आज सकाळी तुमचे 20 ते 25 कार्यकर्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उड्डाण पुलाखाली जमले होते. मला आज सकाळी एक व्हिडिओ मिळाला आहे. 'येडे चाळे करू नका' असा इशारा वसंत मोरे यांनी दिला आहे.

vasant more
Vasant More: थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव द्यायला हरकत नाही, पण त्यापूर्वी..., उद्धव ठाकरेंच्या नेत्यानं खासदारांना दिला सल्ला

वसंत मोरे पूढे म्हणाले, 'मी आज तुमच्या एका अड्ड्यावर एकटा गेलो होतो. गमावण्यासारखे माझ्याकडे काहीच नाही. पण मी हनुमानाचा भक्त आहे आणि आता माझ्या शेपटीला मी मशाल बांधून जर तुमच्या सोन्याच्या लंकेत घुसलो तर लक्षात ठेवा कुठून कुठून जाळ आणि धूर निघेल ते समजणार पण नाही', असा इशारा वसंत मोरे यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com