Thackeray Group Claim : ठाकरे गटाचा विधानसभेच्या 130 जागांवर दावा; सोलापुरातील मेळाव्यात शिवसेना नेत्याचे भाष्य

Solapur Shivsena Melava : महाविकास आघाडीत जागा वाटपात पारंपारिक पद्धतीने ज्या पक्षाकडे जागा असतील, तो पक्ष ती जागा लढवणार आहे. ज्या पक्षाला वाटतं, आमचा उमेदवार निवडून येऊ शकतो, त्या पक्षातून ती जागा मागणी करणं, काही गैर नाही...
Shivsena UBT
Shivsena UBTSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 19 July : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू झाली आहे. एकाच मतदारसंघावर आघाडीतील तीनही पक्षांकडून दावा केला जात आहे. ठाकरे गटाने काल मुंबईत २५ जागा मागितल्याची चर्चा होती. ती चर्चा थांबत नाही तोच सोलापूर दौऱ्यावर आलेले माजी खासदार विनायक राऊत यांनी ‘माध्यमांमधून सध्या तरी शिवसेना ठाकरे गटाच्या 130 जागा जाहीर केलेल्या आहेत, ते तुम्ही मानून चला,’ असे सांगून तेवढ्या जागांवर दावा केला आहे.

विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या उपस्थितीत आज शिवसेना ठाकरे गटाचा (Shivsena UBT) सोलापूरमध्ये मेळावा झाला. त्या मेळाव्याबाबत राऊत म्हणाले, सोलापूर जिल्हा हा शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला राहिला आहे. राज्यातून अधिकाधिक आमदार निवडून आणण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.

विधानसभा निवडणुका ऑगस्ट महिन्यात जाहीर होतील. इंडिया आघाडी बरोबर शिवसेना ठाकरे गट विधानसभा लढवणार आणि प्रचंड मतांनी जिंकणार आहे. महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) जागा वाटपात पारंपारिक पद्धतीने ज्या पक्षाकडे जागा असतील, तो पक्ष ती जागा लढवणार आहे. महाविकास आघाडीत ज्या पक्षाला वाटतं की, आमचा उमेदवार निवडून येऊ शकतो, त्या पक्षातून ती जागा मागणी करणं काही गैर नाही, असेही राऊत म्हणाले.

ते म्हणाले, शिवसेना ठाकरे गटाकडून किती जागा आम्ही जिंकू शकतो, याचा आम्ही अभ्यास केला आहे. योग्य वेळी तो आकडा फोडला जाईल. माध्यमांमधून सध्या तरी शिवसेना ठाकरे गटाच्या 130 जागा जाहीर केलेल्या आहेत तेवढ्या ते तुम्ही मानून चला.

Shivsena UBT
Mahavikas Aghadi : ‘सोलापूर शहर मध्य’ला तौफिक शेख, तर ‘शहर उत्तर’मधून महेश कोठे इच्छूक; महाआघाडीत बिघाडी अटळ!

विशाळगड प्रकरण हे राजकारणासाठी वापरले जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी राजकारण न करता विशाळगडाचा प्रश्न सोडवण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर नतमस्तक होऊन विशाळगडाचा प्रश्न सोडवावा. राजकीय फायद्यासाठी विशाळगडाचा बळी देऊ नका, असे ही राऊत यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कामाचं गांभीर्य राहिलं नाही, त्यामुळे त्यांच्याविषयी फार बोलण्याचं गरज नाही, असंही ते म्हणाले.

Shivsena UBT
Assembly Election 2024 : महाविकास आघाडी विधानसभेला 170 पेक्षा जास्त जागा जिंकेल; जयंत पाटलांचे भाकित

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com