Sharad Pawar, Jayant Patil
Sharad Pawar, Jayant PatilSarkaranama

NCP News : शिवस्वराज्य यात्रेची सांगता, साताऱ्यातील सभेची पुनरावृत्ती.. शरद पवारांच्या सभेवेळी पुन्हा पाऊस; नेमकं काय घडलं

Political News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा बुधवारी इस्लामपूरमध्ये पोहोचली. या यात्रेची सांगता सभाप्रसंगी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
Published on

Sangli News : विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आल्यानंतर मंगळवारपासून राज्यात आचारसंहिता लागली आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती व महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप रखडलेले आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा बुधवारी इस्लामपूरमध्ये पोहोचली. या यात्रेची सांगता सभाप्रसंगी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा गेल्या 24 दिवसांपासून सुरू आहे. बुधवारी इस्लामपूरमध्ये या यात्रेची सांगता सभा झाली. इस्लामपूर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे या सभेला महत्त्व प्राप्त झाले होते.

या सभेवेळी अचानक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे भर पावसामध्ये कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी डोक्यावर खूर्च्या घेत जागा सोडली नाही. पाऊस होत असताना सभास्थळी जयंत पाटील छत्री घेऊन उभे होते.

दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रेची सांगता बुधवारी इस्लामपूर शहरात शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या सभेला शरद पवार यांच्या बरोबर सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, रोहित पाटील यांच्यासह पक्षाचे खासदार, आमदार उपस्थित होते

Sharad Pawar, Jayant Patil
Mahayuti News : राज्यपाल नियुक्त आमदारांमुळे महायुतीची डोकेदुखी वाढली; घटक पक्षातही नाराजी

9 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या यात्रेचे इस्लामपूरपर्यंत 24 दिवस पूर्ण झाले. शिवस्वराज्य यात्रा या 24 दिवसात 19 जिल्हे पूर्ण केले. यात्रेसाठी तब्बल 7 हजार 365 किलोमीटरचा प्रवास केला गेला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षाचे बलस्थान असलेल्या सर्व मतदारसंघात ही यात्रा पोहचली असून पक्षाने जोरदार शक्तीप्रदर्शन या मतदारसंघात केले आहे. या यात्रेची सांगता सभा भर पावसात पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

Sharad Pawar, Jayant Patil
assembly elections News : राजेंद्र शिंगणेंवर केली मिटकरींनी टीका; म्हणाले, 'टच्च पोट फुगल्याने निघाले... '

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com