

Satara News: सातारा शहरातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. शहरातील एका नामांकित शाळेच्या हॉस्टेलमध्ये 24 मुलांचा लैंगिक आणि मानसिक छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या घटनेतील आणखी एक संतापजनक बाब म्हणजे याप्रकरणातील आरोपीची न्यायालयानं मुक्त्तता केल्याची माहिती समोर आली आहे. सातारा शहरातील या घटनेमुळे पुन्हा एकदा शाळेतील महिलांपाठोपाठ आता शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
सातारा पोलिसांनी शहरातील संबंधित शाळेच्या हॉस्टेलमध्ये 'वॉर्ड बॉय'ला म्हणून कार्यरत ऋषिकेश सुभाष चव्हाण या संशयित आरोपीला अटक केली होती. पण न्यायालयानं या आरोपीची जामिनावर मुक्तता केली. तो या शाळेत मागील चार महिन्यांपासून तात्पुरत्या स्वरूपात 'केअर टेकर' म्हणून कामावर होता.
मात्र,आरोपी ऋषिकेश चव्हाण याच्याकडून सुरुवातीच्या काळात तीन मुलांसोबत लैंगिक ,मानसिक छळांसह इतर गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. पण या प्रकरणात आता धक्कादायक बाब म्हणजे तब्बल 24 मुलांच्या पालकांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या चव्हाण विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
संबंधित शाळेच्या हॉस्टेलमध्ये 'वॉर्ड बॉय'ला म्हणून कार्यरत असलेल्या संशयित आरोपी ऋषिकेश चव्हाण याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्याच्यावर मुलांच्या शरीराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श,मारहाण,पैशांची मागणी आणि धमक्या देण्यासारख्या अनेक गैरकृत्यांचा समावेश आहे.
संशयित आरोपी ऋषिकेश चव्हाण याच्याविरोधात 'पॉक्सो' (POCSO) कायद्यांतर्गत सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.पण न्यायालयानं आरोपीला जामीन मंजूर केल्याची माहिती सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.