Solapur Political News : ...म्हणून हिवरगाव ग्रामपंचायतीचे राजकारण 25 वर्षे एकाच कुटुंबाभोवती फिरतेय !

Gram Panchyat Election : छोट्या गावात निवडणुकीवरून होणारे वाद परवडणारे नाहीत....
Gram Panchayat Election News
Gram Panchayat Election NewsSarkarnama
Published on
Updated on

Mangalwedha News : गावातील सर्व घटकांना सोबत घेऊन केलेले काम व सभापतिपदाचा वापर करून योग्य समतोल साधत राजकारण केल्यामुळे सलग 25 व्या वर्षीही गावचं राजकारण एका कुटुंबाभोवती फिरते आहे. आता हिवरगाव ग्रामपंचायत निवडणुकीत सलग पाचव्यांदा सत्ता हस्तगत करण्याची किमया खांडेकर कुटुंबाने केली.

आमदार समाधान आवताडे (Samadhan Awtade) यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वीस वर्षांपूर्वी या गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कमी मतदान असल्यामुळे मतदाराचे मत खेचण्यासाठी अनेक प्रकारच्या युक्त्या वापरल्या जात होत्या. त्यासाठी साम-दाम- दंड -भेद या गोष्टींचा वापर केला जात होता. त्यातून काही वेळेला वादावादीचे प्रसंगदेखील झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Gram Panchayat Election News
Yavatmal Crime Story : नाचण्यावरून माजी आमदाराच्या चालकाची सटकली, रागाच्या भरात त्याने सुरीच भोसकली

छोट्या गावात निवडणुकीवरून होणारे वाद परवडणारे नाहीत, म्हणून गावच्या राजकारणाची दिशा जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर यांनी गावातील सुशिक्षित तरुणांना एकत्र घेत ग्रामपंचायत ताब्यात घेतल्यानंतर या सर्व गोष्टीला फाटा दिला व गावातील राजकीय वैर व इतर गोष्टीत होणारा वाद कमी करण्याचा प्रयत्न केला. स्वतः पाच वर्षे सरपंच म्हणून काम करताना शासनाच्या अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या. (Gram Panchyat)

आई जिजाबाई खांडेकर यांना बिनविरोध केले व मंगल खांडेकर यांनादेखील त्याच कार्यालयात सरपंचपदाची संधी देत राजकीय समतोल साधला. त्यानंतर मागासवर्गीय आरक्षण सोडतीत सुरेखा खरबडे यांना संधी दिली व मागील पाच वर्षांत भाऊ रविकांत खांडेकर यांना संधी दिली. या गावाचे ग्रामदैवत असलेल्या कामसिद्ध देवाची यात्रा सार्वजनिक स्वरूपात कशा पद्धतीने नियोजनबद्ध करावे याचा आदर्श त्यांनी तालुक्याला खांडेकर बंधूंनी घालून दिला.

सरपंच म्हणून प्रदीप खांडेकर यांचा राजकीय अनुभव लक्षात घेता, आमदार समाधान आवताडे यांनी त्यांना सभापतिपदाची संधी दिली. या कार्यकाळात त्यांनी शासनाच्या घरकुल सौभाग्य योजनेतून वीज, मनरेगा, शौचालय, यामध्ये प्रभावी काम करून तालुक्याचा नावलौकिक करण्याचा प्रयत्न केला. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भावजय कमल खांडेकर या सरपंचपदासाठी(Sarpanch) बिनविरोध निवडल्या.

मुक्ताबाई बुरंगे, पूजा कुपाडे, महादेव वाघमोडे, शशिकांत खांडेकर, पारूबाई वाघमोडे, अश्विनी लवटे या सदस्य बिनविरोध निवडून आल्या. एका जागेसाठी निवडणूक लागली. मात्र, या निवडणुकीत आता औपचारिकता राहिली. निवडणुकीपूर्वी अनेक मतदारानी त्यांच्यावर असलेली वैयक्तिक कर्ज किंवा इतर गोष्टीची पूर्तता करावी, अशी मागणी करण्यात आली. मात्र, प्रदीप खांडेकर यांच्या नियोजनबद्ध कौशल्याने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे निवडणुकीत आर्थिक लूट करणाऱ्या मतदारांना मात्र याची चपराक बसली.

Gram Panchayat Election News
PM Modi Shirdi Visit : 'नगर माझे आजोळ; गेली ५३ वर्षांत राज्यकर्त्यांनी निळवंडेच्या कामाचे नुसते नारळ फोडले'

जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर म्हणाले, गावातील सर्व घटकांना सोबत घेऊन केलेले काम व सभापतिपदाचा वापर करून योग्य समतोल सादर राजकारण केल्यामुळे सलग 25 व्या वर्षीही गावच्या राजकारणाची सूत्रे आमच्या घराभोवती फिरत राहिले.

(Edited By Deepak Kulkarni)

Gram Panchayat Election News
PM Modi Shirdi Visit : 'नगर माझे आजोळ; गेली ५३ वर्षांत राज्यकर्त्यांनी निळवंडेच्या कामाचे नुसते नारळ फोडले'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com