Pdcc Bank Election : पीडीसीसीच्या ठरावाचे राजकारण पेटले : भोरमध्ये बैठकीला जाणाऱ्या संचालकांना गाड्या आडव्या लावून रोखले; भाजप-राष्ट्रवादीची पोलिसांत धाव

Bhor News : पुणे जिल्हा बँक निवडणुकीसाठी ठराव घेताना भोरच्या आपटी सोसायटीत भाजप आणि राष्ट्रवादी संचालकांमध्ये वाद झाला. आडवाअडवी, दमबाजीचे आरोप करत दोन्ही गटांनी पोलिसांत फिर्यादी दिल्या.
Pdcc Bank Election
Pdcc Bank ElectionSarkarnama
Published on
Updated on

Bhore, 14 September : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मतदारप्रतिनिधी निवडीसाठी जिल्ह्यात ठराव घेण्यात येत आहेत. भोर तालुक्यातील आपटी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या रविवारी (ता. 13 सप्टेंबर) झालेल्या बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षातील वाद टोकाला गेला.

दोन्ही बाजूच्या संचालकांना बैठकीला जाण्यापासून रोखण्यासाठी गाड्या लावून आडवाअडवी आणि दमबाजी करण्यात आल्याचा आरोप दोन्ही पक्षांकडून करण्यात येत आहे, दोन्ही पक्षांच्या संचालकांनी एकमेकांविरोधात भोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे, त्यामुळे भोरच्या राजकारणात महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादीत पीडीसीसी बॅंकेच्या निवडणुकीत पुन्हा जोरदार संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक जाहीर झाली असून सध्या मतदार प्रतिनिधींचे ठराव केले जात आहेत. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत सहकारी सोसायटी मतदारसंघ सर्वाधिक लक्षवेधी असतो, या गटातून मंत्री, आमदार, खासदार, मातब्बर नेते जिल्हा बॅंकेवर जातात. त्यामुळे सोसायट्यांच्या ठरावाला मोठे महत्व असते.

भोर तालुक्यातील आपटी सहकारी सोसायटीच्या कार्यालयात अध्यक्ष लक्ष्मण पारठे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी सकाळी ११ वाजता मतदार प्रतिनिधी निवडीसाठी बैठक बोलावण्यात आली होती. सोसायटीचे सचिव विठ्ठल पराठे हे एकटेच बैठकीला उपस्थित होते. एकही संचालक या वेळी हजर नव्हता. मात्र, काही वेळाने अध्यक्ष लक्ष्मण पारठे यांनी दरवाजामधूनच सचिव विठ्ठल पारठे यांना बैठकीचा अहवाल मागितला आणि तेही निघून गेले.

दरम्यान, बैठकीला निघालेल्या संचालकांच्या गाड्या अडवून त्यांना बैठकीस वेळेत पोचू नये, यासाठी रोखण्यात आले. आपटी विकास सोसायटीच्या १३ संचालकांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्षासह ११ संचालक बैठकीला येणे अपेक्षित होते. मात्र, बैठकीला एकही संचालक उपस्थित राहिला नाही, त्यामुळे कोरमअभावी बैठक रद्द करण्यात आली.

Pdcc Bank Election
Indapur Politic's : हर्षवर्धन पाटलांच्या कार्यक्रमाला 7 वर्षांनंतर प्रथमच काँग्रेसच्या बड्या नेत्याची हजेरी; राजकीय चर्चेला उधाण...

याबाबत संचालक दत्तात्रेय परखंदे आणि विनोद खुटवड यांनी भोर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दिल्या आहेत. पहिली फिर्याद दत्तात्रेय परखंदे यांनी दिली आहे, त्यात म्हटले आहे की, रविवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास संचालक आप्पा खुटवड (रा.नांदगाव, ता. भोर) आणि जयवंत चव्हाण (रा. हातनोशी, रामोशी वाडी, ता. भोर) यांनी इतर दोघांसह त्यांच्या मोटारीला मोटार आडवी लावून त्यांना अडविण्यात आले.

परखंदे यांच्या गाडीतून जाणारे संचालक जगन्नाथ पारठे, लक्ष्मण गायकवाड, वसंत कुडले, जनाबाई पारठे व सिंधु मादगुडे यांना बैठकीस जाण्यापासून रोखले. एक तासानंतर पावणे बाराच्या सुमारास त्यांना सोडून देण्यात आले, असे परखंदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्याचा तपास हवालदार सुशांत पिसाळ करीत आहेत.

दुसरी फिर्याद विनोद खुटवड यांनी दिली आहे. त्यात खुटवड यांनी म्हटले आहे की, नितीन थोपटे (रा. खानापूर ता. भोर) आणि दत्तात्रेय परखंदे (रा. निगुडघर ता. भोर) यांनी इतर दोघांसह मोटार आडवी लावून त्यांना आणि त्यांच्या वडिलांना दमदाटी केली. त्याचा तपास हवालदार वर्षा भोसले करीत आहेत.

Pdcc Bank Election
Solapur DCC Bank : सोलापूर डीडीसी बॅंकेच्या निवडणुकीत ट्विस्ट : बड्या नेत्याच्या तालुक्यातील सहा ठराव रद्द

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संचालक यांच्यात आडवाअडवीचे राजकारण केले जात आहे. त्यामुळे आपटी सोसायटीचा ठराव कोणाच्या नावाने होणार, याची उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com