Maratha Reservation : सोलापुरात मराठा समाज आक्रमक; भाजप खासदाराचे भाषण बंद पाडले

BJP MP Speech Stopped : विविध विकासकामांचा प्रारंभ करण्यासाठी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी हे मोहोळ तालुक्यातील तरटगाव येथे आले होते. त्या कार्यक्रमात खासदारांचे भाषण सुरू असतानाच मराठा समाजाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आले. त्यांनी महास्वामी यांचे भाषण बंद पाडले. दरम्यान, आक्रमक मराठा समाज पाहून खासदार महास्वामी यांनी सभा रद्द करून माघारी जाणे पसंत केले.
Jaisiddheshwar Mahaswami
Jaisiddheshwar MahaswamiSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी राज्यभरातील मराठा समाज पुन्हा आक्रमक होताना दिसत आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील हे राज्याचा दौरा करत आहेत, तर गावोगावच्या मराठा समाजाकडून नेत्यांना गावबंदी करण्यात आली. गावबंदी असूनही मोहोळ तालुक्यातील तरटगाव येथे विकासकामांचे भूमिपूजन करण्यासाठी आलेले भाजप खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचे भाषण मराठा समाजाने बंद पाडले. आक्रमक मराठा समाज पाहून खासदारांनी आपले भाषण रद्द करून माघारी परतले.

विविध विकासकामांचा प्रारंभ करण्यासाठी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी (Jaisiddheshwar Mahaswami) हे मोहोळ तालुक्यातील तरटगाव येथे आले होते. त्या कार्यक्रमात खासदारांचे भाषण सुरू असतानाच मराठा समाजाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आले. एक मराठा लाख मराठा, मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देत आलेल्या कार्यकर्त्यांनी खासदार महास्वामी यांचे भाषण बंद पाडले. दरम्यान, आक्रमक मराठा समाज (Maratha community) पाहून खासदार महास्वामी यांनी सभा रद्द करून माघारी जाणे पसंत केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Jaisiddheshwar Mahaswami
Shivtare's Big Announcement : विजय शिवतारेंनी दंड थोपटले; ‘बारामतीतून अपक्ष लोकसभा लढवणार...'

सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षणाची मागणी आम्ही केलेली नाही. भाजपची मंडळी शिवाजी महाराजांना आदरस्थानी मानते. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुलालाची शपथ घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी सगेसोयरे या शब्दाचा समावेश करून आरक्षण देण्याचा शब्द दिला होता. मात्र, त्यावर सरकार शब्दही काढत नाही. सरकारचा हा मराठा समाजावरील अन्याय आहे का, असं आम्ही मानायचं का, असा सवाल मराठा आंदेालनातील प्रमुख ॲड. श्रीरंग लाळे यांनी विचारला.

ॲड. लाळे म्हणाले, राज्य सरकारने दिलेल्या दहा टक्के आरक्षणात मेडिकल, जेईईला लागू होत नाही. केंद्रात दहा टक्के मराठा आरक्षण हे ओपनमध्ये गणलं जाणार आहे. मग तुम्ही आमचं डोळं पुसल्यासारखं करणार आहात का. मराठा समाजाने भाजपवर प्रेम करून तुम्हाला निवडून दिले. असं असतानाही मराठा समाजावर अन्याय करणार असाल तर तुमचा कार्यक्रम होऊ देणार नाही. हे फक्त तुमच्यासाठी नाही तर आम्ही काल राष्ट्रवादीचाही कार्यक्रम उधळला आहे. भाजप आमच्यावर वारंवार अन्याय करणार असेल तर आम्ही ते सहन करणार नाही.

Jaisiddheshwar Mahaswami
Baramati Loksabha Constituency : ‘आता सगळ्यांनी मिळून पवारांना पाडा; होऊद्या एकदा त्यांचा कार्यक्रम’

खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी एकदाही संसदेत मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडला नाही, असा सवाल लाळे यांनी उपस्थित केला. त्यावेळी खासदारांनी मी संसदेत मराठा आरक्षणासाठी केलेल्या मागणीचा व्हिडिओ तुम्हाला पाठवून देतो, असे स्पष्ट केले.

सदावर्तेंच्या उमेदवारीला विरोध

मराठा समाजाविरोधात जाणीवपूर्वक काम करणाऱ्या ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना सोलापुरातून भाजप उमेदवारी देणार असेल तर भाजपची ध्येयधोरणे मराठा समाजासाठी अनुकूल नाहीत, असंच मानावं लागेल. त्यावेळी खासदार महास्वामी यांच्यासह उपस्थितांनी सदावर्ते यांच्या उमेदवारीला आमचा विरोध असेल, असे सांगितले.

R

Jaisiddheshwar Mahaswami
Ajitdada Vs Shivtare : शिवतारेंची बदला घेण्याची भाषा; ‘अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आलीय’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com