Air India flight Crash : अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांमध्ये सोलापुरातील पती-पत्नीचा समावेश; मुलाचा व्यवसाय पाहण्याची इच्छा अधुरीच...

Solapur's couple killed in Ahmedabad plane crash : महादेव पवार आणि आशा पवार यांनी सहा महिन्यांपूर्वी इंग्लंडला जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना काही कारणांमुळे तिकीट मिळाले नाही, त्यामुळे त्यांना इंग्लंडला मुलाकडे जाण्याचा दौरा रद्द करावा लागला होता. तसेच वर्षभरापूर्वीही त्यांचा प्रयत्न असफल झाला होता.
Air India flight Crash-Mahadev Pawar-Asha Pawar
Air India flight Crash-Mahadev Pawar-Asha PawarSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 12 June : गुजरातमधील अहमदाबादमध्ये आज (ता. 12 जून) दुपारी एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळून 242 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातील दांपत्याचा समावेश आहे. ते दोघे लंडनमधील मुलाचा व्यवसाय पाहण्यासाठी निघाले होते. मात्र, मुलाचा व्यवसाय पाहण्याची त्यांची इच्छा अधुरी राहिली आहे.

महादेव तुकाराम पवार (वय 68) आणि आशा महादेव पवार (वय 60, सध्या रा. नडियाद, गुजरात, मूळ रा. हातीद, ता. सांगोला, जि. सोलापूर) असे अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दांपत्याची नावे आहेत. त्यांच्या दुर्दैवी मृत्युमुळे सांगोला (Sangola) तालुक्यातील हातिद गावावर शोककळा पसरली आहे.

अहमदाबाद (Ahmedabad) राष्ट्रीय विमानतळावरून उडालेले विमान अवघ्या काही सेकंदात कोसळले. यामध्ये 243 प्रवासी होते, त्यातील एक प्रवासी जीवंत सापडला असून 242 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा त्यात समावेश आहे.

दरम्यान, या दुर्घटनाग्रस्त विमानात सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातील हातीद गावातील महादेव पवार आणि आशा पवार या दोघांचा समावेश आहे. पवार पती-पत्नी मुलाचा व्यवसाय पाहण्यासाठी इंग्लंडमध्ये निघाले होते. मात्र, मुलाचा व्यवसाय पाहण्याचा योग या दाम्पत्याच्या नशिबात नव्हते, कारण विमान लंडनमध्ये जाण्याअगोदरच अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टे ऑफ केल्यानंतर अवघ्या काही वेळेतच कोसळले.

Air India flight Crash-Mahadev Pawar-Asha Pawar
Satara Politic's : शरद पवारांना सांगूनच भाजपमध्ये प्रवेश केला : सत्यजितसिंह पाटणकरांचा दावा

महादेव पवार हे लहानपणापासूनच अहमदाबादमध्ये स्थायिक झाले होते. त्यांचा त्या ठिकाणी व्यवसाय होता. त्यांचा एक मुलगा गुजरातमध्ये ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतो, तर दुसऱ्या मुलाने लंडनमध्ये व्यवसाय सुरू केला होता, तो पाहण्यासाठी पवार दांपत्य निघाले होते. मात्र, इंग्लंडला जाण्यापूर्वीच त्यांचा विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला.

नियतीला ते मान्य नव्हते

महादेव पवार आणि आशा पवार यांनी सहा महिन्यांपूर्वी इंग्लंडला जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना काही कारणांमुळे तिकीट मिळाले नाही, त्यामुळे त्यांना इंग्लंडला मुलाकडे जाण्याचा दौरा रद्द करावा लागला होता. तसेच वर्षभरापूर्वीही त्यांचा प्रयत्न असफल झाला होता. मात्र, सर्व सोपस्कार पार करून ते आज इंग्लंडला निघाले होते. पण अहमदाबाद विमानतळावरून ‘टेक अप’ केल्यानंतर अवघ्या काही सेकंदात कोसळले. नियतीनेच घाला घातल्याने मुलाचा व्यवसाय पाहण्याची आई-वडिलांची इच्छा हवेतच विरली आहे.

Air India flight Crash-Mahadev Pawar-Asha Pawar
Dr. Aniket Deshmukh : गणपतआबांच्या नातवाने जपला पुरोगामी विचार; डॉ अनिकेत देशमुखांनी साधेपणाने केले ‘रजिस्टर मॅरेज’

महादेव पवारांचा गावाशी कायम संपर्क

महादेव पवार यांचा मूळ गाव असलेल्या हातीद गावशी कायम संपर्क होता. पंधरा दिवसांपूर्वी ते गावात येऊन गेले होते. त्यांची जमीन आणि घरही हातीद गावी आहेत. व्यवसायानिमित्त अहमदाबादमध्ये राहत असले तरी पवारांचा हातीद गावाशी कायम संपर्क होता. हातीदमध्ये त्यांचे चुलत बंधू आणि इतर नातेवाईक आहेत पवार. दांपत्याच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे हातीद गावातून हळहळ व्यक्त होत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com