Satara Politic's : शरद पवारांना सांगूनच भाजपमध्ये प्रवेश केला : सत्यजितसिंह पाटणकरांचा दावा

Satyajeetsinh Patankar Join BJP : बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने आपला पक्षप्रवेश केला होता. तर त्या पक्षाशी तुम्हाला गद्दारी करण्याचे काय कारण होते, असा सवाल सत्यजित पाटणकर यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे पाटणमध्ये पुन्हा एकदा देसाई आणि पाटणकरांमध्ये राजकीय संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.
Sharad Pawar-Satyajeet Patankar
Sharad Pawar-Satyajeet PatankarSarkarnama
Published on
Updated on

Satara, 12 June : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सातारा जिल्ह्यातील पाटणचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रवेशानंतर सातारा जिल्ह्यात परतलेले सत्यजित पाटणकरांनी पारंपारिक राजकीय विरोधक मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे, त्यामुळे पाटणमध्ये देसाई विरुद्ध पाटणकर सामना आणखी अटीतटीचा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यापूर्वी सर्व गोष्टी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कानावर घातल्या आहेत. त्यामुळे आम्ही वेगळ्या वाटेने किंवा सूरतमार्गे गुवाहाटीला गेलो नाही, असे सत्यजित पाटणकर यांनी स्पष्ट केले.

सत्यजितसिंह पाटणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शंभूराज देसाई यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, देसाई समर्थकांकडून पाटणकरांवर टीका करताना शंभूराज देसाई यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आले होते, असा दाखला दिला जात आहे. पाटणकर यांच्या भाजप प्रवेशावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, आमदार अतुल भोसले, भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती होती.

शंभूराज देसाई समर्थकांकडून होणाऱ्या टीकेला सत्यजितसिंह पाटणकर यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, त्यावेळी आपला (शंभूराज देसाई) शिवसेना पक्षप्रवेश एवढ्या मोठ्या नेत्याच्या (स्व. बाळासाहेब ठाकरे) उपस्थितीत झाला होता. पण त्यानंतर आपण त्या पक्षाला काय वागणूक दिली. त्यानंतर आपण कसे पक्ष सोडून गेलात, आपण सूरतमार्गे गुवाहाटीला कसे गेलात, अशा प्रश्नांचा भडीमार पाटणकरांनी देसाई समर्थकांवर केला आहे.

Sharad Pawar-Satyajeet Patankar
Dr. Aniket Deshmukh : गणपतआबांच्या नातवाने जपला पुरोगामी विचार; डॉ अनिकेत देशमुखांनी साधेपणाने केले ‘रजिस्टर मॅरेज’

बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने आपला पक्षप्रवेश केला होता. तर त्या पक्षाशी तुम्हाला गद्दारी करण्याचे काय कारण होते, असा सवाल सत्यजित पाटणकर यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे पाटणमध्ये पुन्हा एकदा देसाई आणि पाटणकरांमध्ये राजकीय संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.

आमच्या भाजप प्रवेशाच्या वेळी खुद्द छत्रपती उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, तसेच देशातील सर्वांत मोठी शक्ती असलेल्या भाजपचे महाराष्ट्राचे अध्यक्ष होते, असा टोलाही पाटणकर यांनी विरोधक शंभूराज देसाई समर्थकांना लगावला आहे.

Sharad Pawar-Satyajeet Patankar
Fadnavis-Thackeray Meeting : फडणवीस-राज ठाकरेंच्या भेटीवर मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयाचे सूचक भाष्य; म्हणाले, ‘सब होगा...अच्छा होगा..!’

दरम्यान, साताऱ्यात दाखल होताच सत्यजित पाटणकर यांनी कऱ्हाड जाऊन प्रीतिसंगम गाठले आणि (स्व.) यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी जाऊन दर्शन घेतले. त्यांच्यासोबत ज्येष्ठ नेते हिंदुराव पाटील, राजाभाऊ शेलार, रमेश मोरे आदी प्रमुख नेते उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com