Solapur DCC Bank : ऐन दिवाळीत रंगणार सोलापूर डीसीसीची निवडणूक; सोमवारी प्रारुप, तर 14 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार

Voter List News : सोलापूर डीसीसी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. 21 सप्टेंबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. 30 सप्टेंबरपर्यंत हरकती, 9 ऑक्टोबरपर्यंत निर्णय आणि 14 ऑक्टोबरला अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे.
Solapur DCC Bank Voter List
Solapur DCC Bank Voter ListSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 20 September : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेला आता वेग आला आहे. ‘डीसीसी’च्या प्रारूप मतदार यादीचा मुहूर्त ठरला असून २१ सप्टेंबर रोजी प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. या यादीवर २१ ते ३० सप्टेंबरपर्यंत आक्षेप व हरकती नोंदविण्याची मुदत असणार आहे. घेण्यात आलेले आक्षेप आणि हरकतींवर ९ ऑक्टोबरपर्यंत निर्णय होणार असून, त्यानंतर १४ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत सोलापूर ‘डीसीसी’ बॅंकेची निवडणूक रणधुमाळी रंगणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने २४ जुलै २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०, त्याखालील नियम १९६१ तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम २०१४ मधील नियम ९ ते ११च्या तरतुदीनुसार मतदार यादीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

निवडणुकीसाठी १ जुलै २०२६ हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला आहे, त्यानुसार १३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२६ या कालावधीत प्रतिनिधींचे ठराव मागविण्यात आले होते. प्राप्त ठरावांच्या आधारे प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली आहे.

Solapur DCC Bank Voter List
Ranjitsinh Mohite-Patil : ...अखेर रणजितसिंह मोहिते पाटील मैदानात उतरले; गणेशदर्शनातून डीसीसीसाठी राजकीय गोळाबेरीज

प्रारूप यादी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, पुणे विभाग यांच्या कार्यालयासह सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यालय, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, तसेच जिल्ह्यातील संबंधित तालुका सहकारी निवडणूक अधिकारी व उपनिबंधक/सहाय्यक निबंधक कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध राहणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या संकेतस्थळावरही ती प्रसिद्ध केली जाणार आहे.

Solapur DCC Bank Voter List
Eknath Shinde On Satara Dcc Bank : सातारा जिल्हा बॅंक निवडणुकीबाबत एकनाथ शिंदेंनी केली भूमिका स्पष्ट; म्हणाले, ‘आता...’

महत्त्वाचे टप्पे

२१ सप्टेंबर : प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

२१ ते ३० सप्टेंबर : आक्षेप व हरकती स्वीकारणे

९ ऑक्टोबर २०२६ : आक्षेपांवर निर्णयाची अंतिम तारीख

१४ ऑक्टोबर २०२६ : अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com