Ranjitsinh Mohite-Patil : ...अखेर रणजितसिंह मोहिते पाटील मैदानात उतरले; गणेशदर्शनातून डीसीसीसाठी राजकीय गोळाबेरीज

Solapur Dcc Bank Election 2026 : सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीसाठी भाजपकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. राजेंद्र राऊत नेत्यांच्या भेटी घेत असताना रणजितसिंह मोहिते-पाटील यांनीही भेटीगाठी सुरू केल्याने पुन्हा राजकीय संघर्षाची शक्यता आहे.
Ranjitsinh Mohite-Patil Meet Dharmraj kadadi
Ranjitsinh Mohite-Patil Meet Dharmraj kadadiSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 19 September : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. आमदार राजेंद्र राऊत हे आमदार आणि माजी आमदारांशी चर्चा करत आहेत. दुसरीकडे मोहिते पाटील यांनीही आपल्या भात्यातील अस्त्रे बाहेर काढायला सुरुवात केली आहे. माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भेटीगाठीच्या माध्यमातून राजकीय गोळाबेरीज सुरू केली आहे, त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा मोहिते पाटील विरुद्ध भाजप असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक ताब्यात घेण्याचा भाजपने निर्धार केला आहे. त्यातूनच पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार राजेंद्र राऊत आणि कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वात भाजप निवडणूक लढवत आहे. आमदार राजेंद्र राऊत यांनी नुकतीच करमाळ्याचे आमदार नारायण पाटील, माजी आमदार राजन पाटील, जयवंतराव जगताप, माजी संचालक बबनराव आवताडे यांच्याशी बार्शीत चर्चा केली आहे.

आमदार राऊत यांनी भाजपसाठी राजकीय जुळवाजुळव सुरू केली आहे. अनेकांना ते भाजपसोबत जोडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. राऊत यांना मदतीचा अनेकांनी शब्दही दिला आहे. राऊत यांची जिल्हा बॅंकेवर जाण्याची इच्छा सोसायटी मतदारसंघातून पूर्ण होणार आहे. तसेच आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचीही बॅंकेवर जाण्याची यावेळी स्वप्नपूर्ती होणार आहे.

एकीकडे भाजपने बॅंक ताब्यात घेण्यासाठी जोरदार तयारी चालवली असताना दुसरीकडे मोहिते पाटील यांनी राजकीय गोळाबेरीज सुरू केली आहे. खुद्द माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे मैदानात उतरले आहेत. गणेशदर्शनाचे निमित्त साधून भाजपसह विविध पक्षातील नेतृत्वाशी रणजितसिंह हे संवाद साधत आहेत.

Ranjitsinh Mohite-Patil Meet Dharmraj kadadi
Pdcc Bank Election : हिवरेकरांची पुन्हा डावखरेंनाच पसंती : वसंतरावांनंतर आता ॲड निरंजन डावखरेंचा ‘पीडीसीसी’साठी ठराव

सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख आणि लिंगायत समाजाचे नेते धर्मराज काडादी यांची मोहिते पाटील यांनी गंगा निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. काडादी हे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख मार्गदर्शक आहेत. काडादी यांच्या भेटीवेळी सोलापूर डीसीसी बॅंकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे उपस्थित होते.

सुरेश हसापुरे हे रणजितसिंह मोहिते पाटील यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. रणजितसिंहांच्या संपूर्ण सोलापूर दौऱ्यात ते सोबत होते. मोहिते पाटील यांनी काडादी यांच्यासोबत माजी महापौर शोभा बनशेट्टी,

Ranjitsinh Mohite-Patil Meet Dharmraj kadadi
Eknath Shinde On Satara Dcc Bank : सातारा जिल्हा बॅंक निवडणुकीबाबत एकनाथ शिंदेंनी केली भूमिका स्पष्ट; म्हणाले, ‘आता...’

माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे, पद्माकर नाना काळे, धनंजय पाटील, भारत गारमेंटसचे शफी इनामदार, श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली, रईस टिनवाला आणि नागेश चितकोटी यांची भेट घेतली आहे. यातील अनेक जण हे सहकारी संस्था, कारखाने, गारमेंटस क्षेत्राशी संबंधित आहेत. त्या सर्वांचा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध येतो, त्यामुळे मोहिते पाटील यांची राजकीय गोळाबेरीज महत्वपूर्ण ठरते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com