Solapur Dcc Bank Voting : सोलापूर ‘डीसीसी’साठी 87 टक्के मतदान; मोहिते पाटील अन्‌ देशमुखांच्या निकालाकडे लक्ष...

Political News : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 9 जागांसाठी 86.94 टक्के मतदान झाले. अक्कलकोटमध्ये सर्वाधिक, तर उत्तर सोलापूरमध्ये सर्वांत कमी मतदानाची नोंद झाली.
Solapur Dcc Bank Voting
Solapur Dcc Bank VotingSarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 26 November : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसाठी तब्बल ८ वर्षांनंतर आज (ता. २६ नोव्हेंबर) मतदान झाले. बॅंकेच्या १९ जागांपैकी १० जागा बिनविरोध झाल्याने ९ जागांसाठी ८६.९४ टक्के मतदान झाले. सर्वाधिक १०० टक्के मतदान हे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या अक्कलकोट तालुक्यात झाले असून सर्वांत नीच्चांकी ७१.२५ टक्के मतदान हे उत्तर सोलापूरमध्ये झाले आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यातील लढाईच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

जिल्हा बॅंकेच्या १९ जागांपैकी १० जागा भाजप पुरस्कृत पॅनेलच्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. मात्र, मोहिते पाटील यांनी सर्वपक्षीयांना सोबत घेऊन भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, मतदानाची टक्केवारी जेमतेमच झाल्याची मानले जात आहे.

बँकेसाठी पात्र ठरलेल्या २ हजार ५९६ मतदारांपैकी २ हजार २५७ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविला आहे. गुरुवारी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत जिल्ह्यातील ११ मतदान केंद्रांवर मतदान झाले. या निवडणुकीची मतमोजणी उद्या (शुक्रवारी, ता. २७ नोव्हेंबर) सकाळी ८ पासून सोलापूर बाजार समितीशेजारील शिवदारे सभागृहात होणार आहे. दुपारी १२ पर्यंत या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

माजी आमदार दिलीप माने आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी हे समर्थक मतदारांसह एकत्रित केंद्रावर आले हेाते. सांगोला तालुक्यातील मतदान केंद्रावरील प्रक्रियेबाबत खासदार धैर्यशील मोहिते-पाटील आणि उमेदवार संजय इंगोले यांनी आक्षेप घेतला. या तक्रारीच्या अनुषंगाने केंद्राध्यक्षांकडून अहवाल घेतला जाणार आहे. सांगोल्यातील प्रकार वगळता जिल्ह्यात शांततेत मतदान झाले आहे.

Solapur Dcc Bank Voting
Sugarcane FRP : परिचारकांना निवडणूक लढवायला ‘स्वाभिमानी’चालते; पण त्याच ‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाकडे दुर्लक्ष कसे करता? : काँग्रेस नेत्याचा सवाल

माळशिरस आणि सांगोला सोसायटी मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचे लक्ष आहे. सांगोल्यात आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांना त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते संजय इंगवले यांनी आव्हान दिले आहे. माळशिरसमध्येही अर्जूनसिंह मोहिते पाटील यांना एकेकाळचे मोहिते पाटील समर्थक राहिलेले शहाजीराव ऊर्फ बाबाराजे देशमुख यांनी लढत दिली आहे.

Solapur Dcc Bank Voting
Mohite Patil : मोहिते पाटलांचा खळबळजनक आरोप : ‘सांगोल्यात बोगस मतदान, कोऱ्या मतपत्रिका केंद्राबाहेर नेऊन शिक्के मारून पुन्हा केंद्रात आणल्या...’

तालुकानिहाय झालेले मतदान पुढील प्रमाणे

तालुका...........एकूण मतदान......झालेले मतदान....टक्केवारी

अक्कलकोट........१३६............... १३६............ १०० टक्के

बार्शी................२१४................२०६..............९६.२६

करमाळा.............१६५................१४३...............८६.६७

माळशिरस............३२२...............३०८................९५.६५

माढा...................४३७...............३२१................७३.४६

मंगळवेढा..............१२२................११४...............९३.४४

मोहोळ.................१९३................१७५................९०.६७

पंढरपूर.................३५१.................३०९................८८.०३

सांगोला................२२१..................२१४................९६.८३

उत्तर सोलापूर .........३२७..................२३३.................७१.२६

दक्षिण सोलापूर.........१०८.................९८....................९०.७४

एकूण ................२५९६..................२२५७................ ८६.९४

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.