Jaykumar Gore : सोलापूरच्या पालकमंत्र्यांची शिवाजी चौकात कोंडी; ट्रॅफिक पोलिस नसल्याने गोरेंना तब्बल 15 मिनिटे गाडीतच राहावे लागले बसून...

Solapur Traffic Jam Issue : पालकमंत्री जयकुमार गोरे आज सोलापूर शहरात आले होते. शहरात एन्ट्री होताच त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. पालकमंत्री गोरे हे सोलापूर शहरात येत असताना मुख्य चौकात वाहतूक शाखेचे कर्मचारी उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
Jaykumar Gore
Jaykumar GoreSarkarnama
Published on
Updated on

विठ्ठल सुतार

Solapur, 09 August : राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे हे आज (ता. 09 ऑगस्ट) सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. सोलापूरच्या शिवाजी चौकात नियमितपणे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा खुद्द पालकमंत्री गोरे यांनाच फटका बसला. तब्बल पंधरा मिनिटे गोरे हे वाहतूक कोंडीत अडकले होते. विशेष म्हणजे सोलापूरच्या वाहतूक विभागाचा एकही कर्मचारी चौकात हजर नव्हता, त्यामुळे झालेली वाहतूक कोंडी पाहत बसण्यापलीकडे गोरे यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.

शेवटी जयकुमार गोरेंच्या (Jaykumar Gore) ताफ्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याने पळत येऊन वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर समोरील तीन एसटी बस पुढे गेल्यानंतर गोरेंची वाहतूक कोंडीतून सुटका झाली. पण, नियमितपणे वाहतूक कोंडी होणाऱ्या शिवाजी चौकात पालकमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी एकही वाहतूक पोलिस उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या ताफ्याने दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास सोलापूरच्या (Solapur) संभाजीराजे चौकातून शहरात एन्ट्री केली. पण, पुढे शिवाजी चौकात पोचण्यापूर्वीच त्यांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागले. त्यांचा ताफा हळूहळू पुढे सरकत होता. गोरे यांच्या ताफ्यातील पोलिसांची एक पायलट व्हॅन पुढे निघून गेली. पण, बसस्थानकातून आलेल्या एसटी बसमुळे पालकमंत्र्यांची गाडी वाहतूक कोंडीत सापडली.

मंत्री जयकुमार गोरे यांच्या गाडीच्या पुढे एक आणि शिवाजी चौकात दोन अशा तीन एसटी बस मंत्र्यांच्या ताफ्याच्या पुढे होत्या. बसस्थानकातून बाहेर आलेल्या एसटीच्या मागे दुसरी एक बस होती, त्यामुळे गोरे यांच्या गाड्यांच्या ताफा पुढे जाऊ शकत नव्हता.

Jaykumar Gore
NCP SP's Mandal Yatra : भाजप प्रवेशाची चर्चा असलेल्या बड्या नेत्याची पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंडल यात्रेला दांडी; चर्चेला उधाण

तीन एसटी बसेसमुळे पालकमंत्र्यांची गाडी पुढे जाऊ शकत नव्हती. तसेच, मागूनही नियमितपणे वाहने येत होती, त्यामुळे गोरे यांची गाडी कोंडीत सापडली होती. पुढील तीन एसटी बसेसमुळे शिवाजी चौकात प्रचंड कोंडी झाली होती. मात्र, कोंडी फोडण्यासाठी सोलापूरच्या वाहतूक शाखेचा एकही कर्मचारी जागेवर हजर नव्हता, त्यामुळे पालकमंत्र्यांना हताशपणे गाडीत बसून राहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. ते गाडीत बसून होते.

पालकमंत्री गोरे यांच्या चालकाने बरेच प्रयत्न केल्यानंतरही त्यांची गाडी पुढे जाऊ शकत नव्हती. बसस्थानकातून आलेली एसटी बस त्यांच्या ताफ्यापुढे होती. त्या एसटी बसच्या पुढे इतर वाहने होती. शिवाजी चौकातही दोन एसटी बस होत्या, तसेच एक खासगी बसही उभी होती, त्यामुळे चौक पॅक झाला होता. त्यामुळे गोरेंचा ताफा एसटी बस स्थानकाच्या पुढे एक इंचही पुढे सरकू शकत नव्हता.

Jaykumar Gore
Ajit Pawar On Sayaji Shinde : उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी सयाजी शिंदेंसाठी गायलं अस्सल गावरान गाणं

शिवाजी चौक परिसरात वाहतूक शाखेचा एक कर्मचारी उपस्थित नव्हता, त्यामुळे कोंडी सुटण्याची शक्यता दिसत नव्हती. शेवटी पालकमंत्री गोरे यांच्या ताफ्यातील एक पोलिस कर्मचारी गाडीतून खाली उतरला. त्याने महत्प्रयासाने वाहतूक सुरळीत केली, त्यानंतर पालकमंत्री गोरे यांची वाहतूक कोंडीतून सुटका झाली आणि त्याचा ताफा पुढे मार्गस्थ झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com