Ajit Pawar On Sayaji Shinde : उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी सयाजी शिंदेंसाठी गायलं अस्सल गावरान गाणं

Sayaji Shinde Birthday Program : सयाजी शिंदे यांना बघितल्यानंतर, त्यांच्याबद्दल हे शब्द वापरल्यानंतर एक जुनं गाणं आठवतं, ‘गडी अंगानं उभा आणि आडवा, त्याच्या रुपात गावरान गोडवा...’ हे अस्सल गावरान गाणंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गायलं.
Sayaji Shinde
Sayaji ShindeSarkarnama
Published on
Updated on

Pune, 09 August : सह्याद्री देवराई प्रकल्पाचे प्रणिते आणि विख्यात अभिनेते सयाजी शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुण्यात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्याच कार्यक्रमात बोलताना अजितदादांनी सयाजी शिंदे यांना शुभेच्छा देताना त्यांच्यासाठी खास गाणंही गायली. आपल्या पक्षाच्या नेत्याबद्दल असणारी आत्मीयताही त्यातून दिसून आली.

राज्यात वृक्षलागवडीची चळवळ राबविणारे आणि मराठी, हिंदीसह तेलगू, कन्नड आणि तमिळ चित्रपटसृष्टीत अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. राज्यात त्यांनी ‘सह्याद्री’च्या नावाने तब्बल चाळीस देवराई उभ्या केल्या आहेत. त्या माध्यमातून तब्बल दहा लाख झाडं लावण्याचे मोठे काम अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले आहे.

मराठी चित्रपसृष्टीसह बॉलिवूड आणि टॉलिवूड गाजवणारे सयाजी शिंदे () यांनी ६६ वर्षे पूर्ण करून ६७ व्या वर्षांत पर्दापण केले. त्यानिमित्ताने पुण्यात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या सहकाऱ्याचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सातारा जिल्ह्यातील वेळेकामती या छोट्याशा गावात शेतकऱ्यांच्या घरात सयाजीरावांचा जन्म झाला.

प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी लिहिलेले पत्र अभिनेते सागर कारंडे यांनी वाचून दाखवलं. अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या भाषणातील शब्द हे मनाला ओलावा देणारे होते. सागर कारंडे ते पत्र वाचत असताना सयाजीरावांचे डोळे पाणावले होते. त्यांनाही आईची आठवण आली. शेवटी आई म्हटलं की, आपण सगळं विसरून जातो. हीच आपली मराठी संस्कृती आणि ठेवा आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही, हेही अजितदादांनी (Ajit Pawar) सांगितले.

Sayaji Shinde
Independence Day : दिल्लीच्या लाल किल्ल्यावरील ध्वजवंदन कार्यक्रमाला महाराष्ट्रातील 17 सरपंचांना आमंत्रण; पुणे-सोलापुरातील दोघांचा समावेश

उपमुख्यमंत्री म्हणाले, सह्याद्रीच्या घनदाट जंगल परिसरातून निघालेला हा मुलगा कठोर परिश्रम, चिकाटी आणि असामान्य कलागुणांच्या जोरावर देशभरातील चित्रपटसृष्टीमध्ये आपले रोवून उभा आहे. जनसामान्यांच्या हृद्‌यावर अधिराज्य गाजवत आहे. पडद्यावर त्यांनी साकारलेला खलनायक असो की नायक त्यांची प्रत्येक भूमिका वास्तवाचा वारसा ठरलेली आहे. त्यांनी प्रत्येक वेळा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकल्याचे आपण पाहत आलेलो आहे.

सयाजी शिंदे यांचे महाराष्ट्रापेक्षा दक्षिणेत अधिक चाहते आहेत. तेथील चित्रपटसृष्टी आणि रसिकांनी या मराठी कलावंतला अक्षरशः डोक्यावर घेतलेले आहे. त्यांचे हे यश केवळ पउद्यवारच नाही तर पडद्याच्या बाहेरही दिसतं. पर्यावरण संवर्धनाचा अखंड योद्धा म्हणून ते काम करतात. सह्याद्रीमधील मातीचा रांगडेपणा त्यांच्यामध्ये आहे. तो रांगडेपणा सयाजीरावांच्या अंगात भिनलेला आहे.

स्पष्टवक्तेपणा, सडेतोड बोलणं, जसं आहे तसं दिसणं, नुसतं दिसणंच नाही तर तसं वागणं, जे ओठात तेच पोटात हा अस्सलपणा त्यांच्या अंगात आहे. त्यांच्यातील आणि माझ्यातील हाच गुण सारखा असल्यामुळे आमची वेव्हलेन जुळलेली आहे, असाही अजितदादांनी दावा केला.

Sayaji Shinde
Solapur kidnapping Case : तीन महिन्यांपूर्वीचा तो व्हिडिओ अन्‌ शरणू हांडेचे अपहरण; काय सांगते कनेक्शन?

सयाजी शिंदे यांना बघितल्यानंतर, त्यांच्याबद्दल हे शब्द वापरल्यानंतर एक जुनं गाणं आठवतं, ‘गडी अंगानं उभा आणि आडवा, त्याच्या रुपात गावरान गोडवा...’ हे अस्सल गावरान गाणंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गायलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com