NCP SP's Mandal Yatra : भाजप प्रवेशाची चर्चा असलेल्या बड्या नेत्याची पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंडल यात्रेला दांडी; चर्चेला उधाण

Maharashtra Political News : मंडल यात्रेला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रमुख सारे नेते उपस्थित आहेत. मात्र, पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील अनुपस्थित आहेत, त्यामुळे त्याची चर्चा हेात आहे.
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 09 August : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यात मंडल यात्रा काढण्यात येत आहे. क्रांती दिनाचे औचित्य साधून काढण्यात आलेल्या या मंडल यात्रेला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नागपूरमध्ये हिरवा झेंडा दाखवला. या यात्रेच्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह पक्षाचे झाडून सारे नेते उपस्थित आहेत. मात्र, वरिष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांनी या मंडल यात्रेला दांडी मारल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे त्यांच्या नाराजीबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

क्रांती दिनाचे निमित्त साधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मंडल यात्रा काढण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात मंडल आयोगाची अंमलबजावणी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली होती. पवारांनी ओबीसींसाठी घेतलेल्या निर्णयाची माहिती व्हावी, यासाठी ही यात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा पहिल्या टप्प्यात विदर्भातील अकरा जिल्ह्यांत फिरणार आहे.

या यात्रेला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि विदर्भातील इतर सर्व प्रमुख नेते उपस्थित आहेत. मात्र, माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची गैरजहेरी प्रकर्षाने जाणवणारी आहे. त्या अनुपस्थितीबाबत वेगवेगळी चर्चा सुरू झाली आहे.

जयंत पाटील यांनी नुकतेच प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मध्यंतरी रोहित पवार आणि त्यांच्या समर्थकांकडून प्रदेशाध्यक्षपदी नव्या रक्ताला संधी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर पक्षात मोठे वादंग उठले होते. कारण जयंत पाटील यांनीही सभेत बरेच काही सुनावले होते. त्यानंतर पक्षातील वाद थंडावल्यानंतर काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

Jayant Patil
Ajit Pawar On Sayaji Shinde : उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी सयाजी शिंदेंसाठी गायलं अस्सल गावरान गाणं

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जयंत पाटील यांच्याबाबत वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. विशेषतः त्यांच्या महाविद्यालयाच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना डावलून त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री तथा भाजप नेते नितीन गडकरी यांना निमंत्रित केले होते. त्यावेळी जयंतरावांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली होती.

Jayant Patil
Independence Day : दिल्लीच्या लाल किल्ल्यावरील ध्वजवंदन कार्यक्रमाला महाराष्ट्रातील 17 सरपंचांना आमंत्रण; पुणे-सोलापुरातील दोघांचा समावेश

महायुतीकडून त्यांची मतदारसंघासह विविध ठिकाणी कोंडी करण्यात येत आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडूनही त्यांच्याकडे बोट करण्यात येत आहे, त्यामुळे जयंत पाटील हे कोणता निर्णय घेणार याची चर्चा झडत असतानाच आज नागपुरातून सुरू होणाऱ्या मंडल यात्रेला जयंत पाटील यांची असलेली अनुपस्थिती बरेच काही सांगून जाणारी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com