No Vehicle Day : सोलापूरचे महापौर दर सोमवारी सायकलवरून महापालिकेत येणार; ZPपाठापोठ पालिकेतही ‘नो व्हेईकल डे’

Solapur Mayor News : सोलापुरात ‘नो व्हेईकल डे’ चळवळीला वेग आला असून महापौर विनायक कोंड्याल यांनी दर सोमवारी सायकलवरून महापालिकेत जाण्याची घोषणा केली आहे.
 Vinayak Kondyal
Vinayak KondyalSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 14 May : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर सोलापूर जिल्हा परिषदेने प्रत्येक सोमवारी ‘नो व्हेईकल डे’ राबविण्याचा निर्णय घेतला. सोलापूर महापालिकेनेही झेडपीच्या पावलावर पाऊन ठेवून ‘नो व्हेईकल डे’ जाहीर केला आहे, महापौर विनायक कोंड्याल यांनी स्वतः दर सोमवारी सायकलवरून महापालिकेत येण्याची घोषणा केली आहे. इंधन बचत आणि पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने सोलापुरात ‘नो व्हेईकल डे’ची चळवळ वेग घेत असल्याचे दिसून येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर पहिल्याच दिवशी सोलापुरात फज्जा उडाल्याची बातमी ‘सकाळ’ने बोलक्या छायाचित्रासह प्रकाशित केली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेकडून दर सोमवारी ‘नो व्हेईकल डे’ जाहीर करण्यात आला होता. आता महापालिकेनेही त्याच दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

महापालिकेतील सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रत्येक सोमवारी खासगी दुचाकी अथवा चारचाकी वाहनांचा वापर टाळावा. शासकीय वाहनांचाही कमीत कमी वापर करावा, अशी सूचना करण्यात आली आहे.

 Vinayak Kondyal
Kolhapur Shiv Sena : कोल्हापुरात शिवसेनेची शक्ती दुभंगली, शक्तीपीठ महामार्ग ठरतोय आमदारांच्या वादाचे कारण

बस, सायकल, इलेक्ट्रिक वाहने किंवा पायी प्रवासाला प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमाला पूरक म्हणून शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी येत्या दीड ते दोन महिन्यांत ४० ई-बस सुरू करण्याचा प्रयत्न महापालिकेकडून केला जाणार आहे.

 Vinayak Kondyal
Nitin Gadkari Tour : गडकरींनीही वाहनांचा ताफा सोडला : बसने प्रवास करत केली पालखी मार्गाची पाहणी, पवारांचे आमदार, खासदारही सहभागी

मी स्वतःपासून सुरुवात करणार

युद्धजन्य परिस्थिती, वाढते इंधन दर, जागतिक तापमानवाढ आणि वाढते वायू प्रदूषण या पार्श्वभूमीवर इंधनाचा वापर काटकसरीने आणि गरजेपुरताच करण्याची आवश्यकता आहे, असे महापौर कोंड्याल यांनी स्पष्ट केले. इतरांना सांगताना स्वतःपासून सुरुवात होणे आवश्यक आहे, त्यामुळे येत्या सोमवारपासून मी स्वतः सायकलवरून महापालिकेत येणार आहे, असे महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com