Solapur News : रणजितसिंह शिंदेंचा आमदार अभिजीत पाटलांवर पलटवार : "350 कोटींची चोरी करणारा हा बहाद्दर रात्रीत जाऊन मुख्यमंत्र्यांचं पाय धरतो..."

Solapur News : सोलापूर जिल्हा दूध संघाच्या जागा विक्रीवरून आमदार अभिजीत पाटील आणि अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
Ranjitsinh Shinde vs Abhijit Patil | Solapur Milk Union Row
Ranjitsinh Shinde vs Abhijit Patil | Solapur Milk Union RowSarkarnama
Published on: 
Updated on: 

सोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाची जी जागा विकली आहे, ती सरकारची परवानगी घेऊनच विक्री केली आहे. पण, काही बहाद्दर (आमदार अभिजीत पाटील) स्वतःच्या कारखान्यातील 350 कोटींच्या चोऱ्या लपवण्यासाठी दूध संघावर आरोप करत आहेत, असा पलटवार जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी केला.

शिंदे म्हणाले, मागील अनेक दिवसांत काही लोकांनी जिल्हा दूध संघाबाबत बेछुट आरोप केले. जिल्हा दूध संघाच्या जागा विक्री केल्याचाही आरोप करण्यात आला. मात्र, जिल्हा दूध संघाने परस्पर कोणत्याही जागा विकल्या नाहीत. ज्या जागांची विक्री केली, त्या राज्य सरकारच्या नियमांत राहून, परवानगी घेऊन जागा विक्री केल्या आहेत.

जी जागा विक्री केली आहे, ती पंढरपूरमधील दूध संघाची केली आहे. टेंभुर्णी किंवा नवी मुंबईची जागा विक्री केलेली नाही. सोलापूर दूध संघ DRT कोर्टात HDfC बँकेविरोधात लढत आहे. त्या बँकेने या दोन्ही ठिकाणच्या जागा विक्री केल्या आहेत, असा दावाही रणजितसिंह शिंदे यांनी केला.

Ranjitsinh Shinde vs Abhijit Patil | Solapur Milk Union Row
Solapur Guardian Minister: सोलापूरचे पालकमंत्री बदलणं हे पतसंस्था बुडवण्याइतकं सोपं नाही; राम सातपुतेंनी मोहिते पाटलांना डिवचलं

शिंदे म्हणाले, पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यात साडेतीनशे कोटी रुपये भ्रष्टाचार झाला आहे, त्याचे पुरावे आम्ही लवकरच देऊ. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या नावावर 40 कोटी दाखवले. मात्र, प्रत्यक्षात 5 कोटी दिले, ज्यांचे पेट्रोलपंप नाहीत त्यांना 2 कोटीचे बिलाचे धनादेश दिले आहेत.

आमदार अभिजीत पाटलांना आव्हान आहे की, त्यांनी दूध संघाची चौकशी लावावी. आम्ही विठ्ठल साखर कारखान्याची चौकशी लावतो. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची सखोल चौकशी करावी अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे. विठ्ठल कारखान्याने जे कर्ज काढले ते चुकीच्या पद्धतीने हडप केले आहे, असा आरोप शिंदे यांनी केला. तसेच हा बहाद्दर (अभिजीत पाटील) रात्रीत जाऊन मुख्यमंत्र्यांचे पाय धरतो, कधी दुसरीकडे जातो कधी तिसरीकडे जातो. आपण स्वतःचे बघावे मग लोकांची मापे काढावीत, असे आव्हानही शिंदे यांनी दिले.

Ranjitsinh Shinde vs Abhijit Patil | Solapur Milk Union Row
Satara DCC Bank : सातऱ्यात मातब्बर नेत्यांचा 'प्लॅन B’ तयार; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ‘पर्यायी उमेदवारां’ची चर्चा

तुळशी गावच्या पाण्याचा प्रश्न सुटेल :

तुळशी गाव विकणे या घटनेबाबत रणजितसिंह शिंदे म्हणाले, तुळशी गावाचा समावेश तत्कालीन आमदार बबनदादा शिंदे यांनी करुन घेतला होता. त्याबाबत साडेतीनशे कोटींची सुप्रमा झाली आहे, ती मंजूर झाली की तुळशी गावच्या पाण्याचा प्रश्न सुटेल.

झेडपी निवडणुकीवेळी तुळशी गावाला 86 लाख मंजूर केले मात्र त्याची रक्कम वाढून 1 कोटी 25 लाखावर गेली आहे. पालकमंत्र्यांनी त्याला मंजुरीचे आदेश दिले आहेत लवकरच तो प्रश्न सुटेल. यातून 1 तलाव आणि 2 ओढ्यांना पाणी देण्यासाठी पाईपलाईन टाकण्यात येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com