Satara DCC Bank : सातऱ्यात मातब्बर नेत्यांचा 'प्लॅन B’ तयार; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ‘पर्यायी उमेदवारां’ची चर्चा

Satara DCC Bank : सातारा जिल्हा बँक निवडणुकीत दहा वर्षांच्या संचालकपदाच्या नियमाची चर्चा सुरू असताना विद्यमान संचालकांकडून पत्नी, मुलगा आणि भावांसह कुटुंबातील सदस्यांचे पर्यायी अर्ज दाखल होत आहेत.
Satara Dcc Bank
Satara Dcc BankSarkarnama
Published on: 
Updated on: 

Satara DCC Bank : सलग १० वर्षे संचालक राहिलेल्यांनी अपात्रतेच्‍या भीतीने सावधगिरी म्‍हणून, आता आपल्यासोबतच पत्नी, मुलगा, भाऊ असे कुटुंबातीलच सदस्‍यांचे पर्यायी उमेदवार म्‍हणून अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी २१ उमेदवारांनी २७ अर्ज दाखल केले. यात खासदार उदयनराजे भोसले, बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, विद्यमान संचालक रामराव लेंभे, राजेंद्र राजपुरे, प्रदीप विधाते, प्रभाकर घार्गे, तसेच इंदिरा घार्गे, बाबासाहेब कदम, महेंद्र देसाई आदी नेत्यांचा समावेश आहे.

जिल्हा बँक निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी शेवटचे काहीच दिवस उरले आहेत. अद्याप अनेक दिग्गज नेत्यांचे अर्ज भरणे बाकी आहे. यावेळेस रिझर्व्ह बॅंकेच्या अधिनियमानुसार सलग दहा वर्षे संचालक राहिलेल्यांना तीन वर्षांची विश्रांती घ्यावी लागणार आहे. तसेच त्यातूनही अर्ज भरले आणि तक्रार दाखल झाल्यास असे संचालक निवडून आल्यावर अपात्र ठरण्‍याची शक्‍यता गृहित धरून संबंधितांनी सावध भूमिका घेत स्वत:च्या अर्जासोबत आपला बंधू, पत्नी, मुलाचा अर्ज भरण्यास प्राधान्य दिले आहे.

मंगळवारी १० उमेदवारांनी तब्बल १५ अर्ज भरले आहेत. यामध्ये सातारा विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून काँग्रेसचे बाबासाहेब कदम, महाबळेश्वर सोसायटी मतदारसंघातून विद्यमान संचालक राजेंद्र राजपुरे, तसेच रूपाली राजेंद्र राजपुरे, खटाव विकास सोसायटी मतदारसंघातून प्रभाकर घार्गे, पत्नी इंदिरा घार्गे, धनंजय चव्हाण यांचा अर्ज दाखल झाला आहे, तर सर्वाधिक लक्षवेधी असणाऱ्या महिला राखीवमधून आज मोनल साळुंखे, राजेश्वरी रणजितसिंह देशमुख हे दोन अर्ज दाखल झाले, तसेच नागरी बॅंका, पतसंस्था मतदारसंघातून विद्यमान संचालक रामराव लेंभे, कोरेगाव शिवसेनेचे मनोहर बर्गे यांनी अर्ज दाखल केले.

Satara Dcc Bank
Satara DCC Bank : सातारा जिल्हा बँकेसाठी शंभूराज देसाईंच्या डोक्यात वेगळाच ‘प्लॅन’? भाजपने महायुतीचा नारा दिला, पण राष्ट्रवादी-शिवसेना सावध!

कृषी उत्पादक व प्रक्रिया मतदारसंघातून राजेंद्र भोईटे, औद्योगिक, विणकर व मजूर संस्था मतदारसंघातून बॅंकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, तसेच त्यांचे पुतणे महेंद्र देसाई, सुनील वाघ यांनी अर्ज भरले आहेत. इतर मागास प्रवर्गातून विद्यमान संचालक प्रदीप विधाते, तसेच मुलगा प्रतीक विधाते, सुरेंद्र गुदगे, योगेश फडतरे यांनी अर्ज भरले आहेत. विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातून सुनील वाघ, रणजित सुरेश जाधव, तसेच गृहनिर्माण आणि दुग्ध संस्था मतदारसंघातून खासदार उदयनराजे भोसले यांनी आणखी एक अर्ज भरला आहे.

Satara Dcc Bank
Ahilyanagar DCC Bank Election : राम शिंदेंनंतर खासदार लंके जिल्हा बँकेच्या मैदानात; विधान परिषदेत भाजपला नडणारे दत्तात्रय पानसरेंच्या भूमिकेमुळे नव्या समीकरणांची चर्चा

धावपळीचा ठरणार गुरुवार

आगामी दोन दिवसांत अनेक दिग्गज नेते अर्ज भरणार आहेत. एक ऑक्टोबरला सर्वाधिक अर्ज भरले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

shivendra raje bhosale-makarand patil-shambhuraj desai
Shivrupraje Khardekar-Ramraje Naik Nimbalkar
shivendra raje bhosale-makarand patil-shambhuraj desai
Satyajeet Patankar-Shambhuraj Desai
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com