अनगर एकहाती जिंकणाऱ्या राजन पाटलांना मोहोळमध्ये धक्का! 22 वर्षाची तरुणी झाली नगराध्यक्ष

mohol municipal election : राज्यातील विविध नगरपरिषदेच्या निवडणूकीचा निकाल समोर येत असनाताच मोहोळ नगरपरिषदेची निवडणुकीचा निकालही समोर आला आहे.
siddhi raju vastre youngest mayor
siddhi raju vastre youngest mayorsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. मोहोळ नगराध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत शिवसेनेच्या सिद्धी राजू वस्त्रे यांनी 170 मतांनी विजय मिळवला.

  2. अवघ्या 22 वर्षांच्या सिद्धी वस्त्रे या नगराध्यक्षपदी निवडून आल्या असून त्यांनी इतिहास रचला आहे.

  3. भाजपाला सर्वाधिक जागा मिळूनही नगराध्यक्षपद गमवावे लागल्याने “गड आला पण सिंह गेला” अशी परिस्थिती निर्माण झाली.

mohol News : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या व अत्यंत चुरशीने पार पडलेल्या मोहोळच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सिद्धी राजू वस्त्रे या 170 मतांनी विजयी झाल्या. त्या अवघ्या 22 वर्षांच्या आहेत. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शीतल क्षीरसागर यांनाही पराभवाची चव चाखावी लागली. या निवडणुकीत भाजपाला 11, शिवसेनेला 8 तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. त्यामुळे भाजपची "गड आला पण सिंह गेला" अशी अवस्था झाली.

मोहोळ नगरपरिषदेची निवडणूक ही अत्यंत चुरशीने पार पडली. माजी आमदार राजन पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्याने या निवडणुकीत जास्तच रंगत आली. विशेष म्हणजे भाजपचे अपवाद वगळता सर्व चेहरे नवे होते. यात मुस्लिम समाजाचे 4 नगरसेवक विजयी झाले. निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, गुलालाची उधळण केली. शहरातील सर्व रस्ते गुलालाने माखले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दीपक गायकवाड यांना मानणारा मोठा वर्ग शहरात असूनही त्यांचे चिरंजीव शिवरत्न गायकवाड यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले.

सुरुवातीच्या काळात भाजप विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी चुरस होईल असे वातावरण होते. मात्र पुन्हा लढत रंगतदार झाली. यात धनशक्तीचा पराभव होऊन लोकशाहीचा विजय झाल्याची चर्चा शहरात होती. यात नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शीतल क्षीरसागर यांनीही कडवी झुंज दिली. प्रत्येक फेरी अखेर निवडणूक निर्णय अधिकारी निकाल जाहीर करीत होते.

siddhi raju vastre youngest mayor
Municipal Election : अंबरनाथमध्ये बोगस मतदार, EVM मध्ये छेडछाड अन् राड्यानंतर आता धक्कादायक प्रकार उघड, आयोगच्या कर्मचारीच बोगस?

या गोष्टी निकालात गेम चेंजर ठरल्या

शिंदे सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेतील भाषण सर्वसामान्यांना आश्वासक वाटले. स्व.पंडित देशमुख यांची झालेली हत्या हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. शहरात ओबीसी समाज जादा आहे, त्यांची एकजूट या निवडणुकीत दिसून आली. लिंगायत समाज एकवटल्याचे चित्र पाहायला मिळाले.

तब्बल 30 वर्षानंतर संधी

तब्बल 30 वर्षानंतर वस्त्रे परिवार निवडणुकीच्या रिंगणात उतरला. या पूर्वीचा विश्वास कायम ठेवत पुन्हा परिवाराला मतदारांनी संधी दिली. शहरातील रस्ते, रुग्णालय,पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हे सोडविण्यासाठी प्राधान्य देणार.

-सिद्धी वस्त्रे - नूतन नगराध्यक्ष, मोहोळ

मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षसह निवडुन आलेले नगरसेवक व त्यांना पडलेली मते पुढील प्रमाणे

नगराध्यक्ष

सिद्धी वस्त्रे (शिवसेना) 170 मते

प्रभाग क्रमांक-1

अ) स्वप्नाली जाधव-657 (उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना)

ब) सतीश काळे-801 (भाजपा)

प्रभाग क्रमांक-2

अ) सपना अष्टूळ-651 (शिवसेना)

ब) अजय कुर्डे-624 (शिवसेना)

प्रभाग-3

अ) साखरबाई बरकडे-653 (शिवसेना)

ब) रमेश बारसकर-1392 (शिवसेना)

प्रभाग क्रमांक-4

अ) दत्तात्रेय खवळे-(भाजपा)-1233

ब) शेख शाहिस्ता परवीन मुस्ताक-1080 (भाजप)

प्रभाग 5

अ)सरिता संतोष सुरवसे-759 (भाजप)

ब) विक्रम फडतरे-652 (भाजप)

प्रभाग 6

अ) शहनाज बेगम शौकत तलफदार-597 (भाजप)

ब) रुपेश हिरालाल धोत्रे-710 (भाजप)

प्रभाग क्र 7

अ) भारती भारत बरे-748 (भाजप)

ब)अझरुद्दीन अनिस कुरेशी-643 (भाजप)

प्रभाग क्र.8

अ) राणी चंद्रकांत गोडसे-782 (शिवसेना)

ब)प्रमोद मोहन डोके-757 (भाजप)

प्रभाग क्र 9

अ) लखन जगदीश कोळी-1061 (शिवसेना)

ब)शेख सरताज सलीम-778 (शिवसेना)

प्रभाग क्र 10

अ) आरती प्रशांत गाढवे-801(भाजप)

ब) चैतन्य पद्माकर देशमुख-826 (शिवसेना)

siddhi raju vastre youngest mayor
municipal election : दहा दिवस जादा मिळूनही मतदान वाढले नाही! महायुती-मविआ चिंतेत, उमेदवारांची धाकधूक वाढली

FAQs :

1. मोहोळ नगराध्यक्षपदी कोण विजयी झाले?
शिवसेनेच्या सिद्धी राजू वस्त्रे विजयी झाल्या आहेत.

2. सिद्धी वस्त्रे यांचे वय किती आहे?
त्या अवघ्या 22 वर्षांच्या आहेत.

3. सिद्धी वस्त्रे किती मतांनी विजयी झाल्या?
त्या 170 मतांनी विजयी झाल्या.

4. भाजपाला किती जागा मिळाल्या होत्या?
या निवडणुकीत भाजपाला 11 जागा मिळाल्या.

5. “गड आला पण सिंह गेला” याचा अर्थ काय?
बहुसंख्य जागा जिंकूनही भाजपाला नगराध्यक्षपद मिळाले नाही, हीच स्थिती दर्शवण्यासाठी ही म्हण वापरली जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com