Video Sharad Pawar : शरद पवार 'इलेक्शन मोड'वर, राज्यव्यापी दौरा करणार!

Assembly Election Sharad Pawar : शरद पवार हे जनसामन्यांमध्ये जात महायुतीच्या अपयशाचा पाढा वाचण्याची तसेच मतदारसंघ निहाय आढाव घेत रणनिती निश्चित करण्याची शक्यता आहे.
Sharad Pawar
Sharad Pawarsarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar News : विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेसाठी 70 दिवसांपासून कमी कालावधी राहिल्याचा प्रचार राजकीय पक्षांकडून करण्यात येतो आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना पक्ष कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना करत आहे. लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्याने महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने ज्येष्ठ नेते शरद पवार अॅक्शन मोडवर आले आहेत.

शरद पवार ऑगस्ट महिन्यात राज्यव्यापी दौरा करणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात शिवनेरी किल्ल्यापासून होईल, असे वृत्त 'साम टीव्ही'ने दिले आहे.

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासून शरद पवार हे राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात करण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी शरद या दौऱ्यातून रणशिंग फुंकतील. या दौऱ्यात शरद पवारांसोबत कोण सहभागी होणार याची माहिती अजून समोर आली नाही.

Sharad Pawar
Raju Patil News : ''इतकं होतं तर उद्धव ठाकरेंनी का नाही राज ठाकरेंना विनंती केली? '' ; आमदार राजू पाटलांचा थेट सवाल!

लोकसभेच्या निकालानंतर महायुती घडबडून जागी झाली आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात महायुती सरकारने घोषणांचा पाऊस पाडला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेंमचेंजर ठरेल, असे सांगितले जात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते देखील सावध झाले असून रणनिती ठरवत आहेत.

शरद पवार हे जनसामन्यांमध्ये जात महायुतीच्या अपयशाचा पाढा वाचण्याची तसेच मतदारसंघ निहाय आढाव घेत रणनिती निश्चित करण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून महायुतीतील पक्षांकडून विरोधी पक्षांना टार्गेट केले जात होते. मात्र, शरद पवारांनी आरक्षणावर सुरू असलेल्या वादावर आपली भूमिका स्पष्ट करत जरांगे, भुजबळ, हाके यांच्याशी सरकारने चर्चा करावी, अशी भूमिका घेतली आहे.

Sharad Pawar
Mahayuti News : संजय राऊतांची 'ती' टीका महायुतीच्या नेत्यांच्या जिव्हारी; सुनील तटकरेंसह महाजनांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com