Samadhan Autade News: 'बाजार समितीत' भाजप गट मोठा करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन लढणार; आमदार अवताडेंनी कसली कंबर

MLA Samadhan Autade's Preparation For Election: सोबतीला येणाऱ्याला सोबत घेऊन निवडणूक लढवणार आ.आवताडे
MLA Samadhan Autade : Solapur News :
MLA Samadhan Autade : Solapur News :Sarkaranama

Krushi Utpanna Bazar Samiti : कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली असून, जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊन आपण ही निवडणूक लढणार आहोत. भाजप पक्ष व गट मोठा करण्यासाठी सगळ्यांनी तयारीला लागा, विजय आपलाच असेल, असा विश्वास भाजपचे आमदार समाधान आवताडे (Samadhan Autade) यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना व्यक्त केला.

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी आवताडे यांनी सूतगिरणीच्या सभागृहामध्ये कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. ते बोलत होते यावेळी बोलताना आमदार अवताडे म्हणाले की, "सध्या राज्यात व देशात भाजपची सत्ता असल्याने तालुक्याच्या विकासासाठी निधीच्या बाबतीत आपण कुठेही कमी पडणार नाही. सभापती सोमनाथ अवताडे यांनी बाजार समितीमध्ये उत्कृष्ट व पारदर्शक कारभार करत राज्यात बेस्ट सभापती म्हणून पुरस्कार मिळवला आहे.

MLA Samadhan Autade : Solapur News :
Mangalveda News : मंगळवेढ्याचा समविचारी गट भाजपत जाणार की प्रशांत परिचारकांनाच राष्ट्रवादीत आणणार?

सोमनाथ अवताडेंच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा बाजार समितीच्या निवडणुकीला आपण सामोरे जाणार, असून प्रत्येक कार्यकर्त्याने ही माझी निवडणूक आहे, असे समजून कामाला लागा. जे चांगल्या विचाराचे लोक आपल्या सोबत येतील त्यांना सोबत घेऊन आपण निवडणुकीला सामोरे जाणार असून, बाजार समितीतील पाच वर्षाचे कामकाज पाहता प्रत्येक सभासद आपल्या सोबत आहे. त्यामुळे आपण बाजार समिती जिंकणार आहोत, अशी ग्वाही कार्यकर्त्यांना दिली.

MLA Samadhan Autade : Solapur News :
Mangalveda News : आमदार समाधान आवताडे पाणीप्रश्नावरून आपल्याच सरकारवर बरसले

या बैठकीमध्ये संत दामाजीचे संचालक अशोक केदार माजी संचालक तानाजी पाटील सोमनाथ अवताडे यांची भाषणे झाली. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ अवताडे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष दिलीप चव्हाण उपस्थित होते.

तसेच, पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप खांडेकर, अंबादास कुलकर्णी सुधाकर मासाळ, सूर्यकांत ढोणे धनंजय पाटील तानाजी पाटील चंद्रकांत पडवळे,रावसाहेब चौगुले रावसाहेब मेटकरी दीपक सुडके जगन्नाथ रेवे, लक्ष्मण नरोटे,राजन पाटील,सुनील कांबळे,दत्ता साबणे शिवाजी पवार, सुरेश भाकरे,भारत कोळेकर,अशोक केदार, बसवंत पाटील, सचिन शिवशरण, मच्छिंद्र सरगर यांचे सह विविध गावचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com