Pravin Gaikwad Attack: सोलापुरात मराठा समाजाच्या बैठकीत राडा! प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणी चर्चेसाठी बोलावलं अन् वेगळ्याच कारणासाठी भिडले

Pravin Gaikwad Attack News : पण इथं नेमकं असं काय घडलं? कशामुळं उपस्थित लोक भडकले? जाणून घेऊयात.
Solapur Rucks
Solapur Rucks
Published on
Updated on

Pravin Gaikwad Attack News : सोलापुरातील शासकीय विश्रामगृह इथं सकळ मराठा समाजाच्यावतीनं आयोजित बैठकीत तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याविरोधात चर्चेसाठी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत वेगळ्याच कारणासाठी गोंधळ पाहायला मिळाला. पण इथं नेमकं असं काय घडलं? कशामुळं उपस्थित लोक भडकले? जाणून घेऊयात.

Solapur Rucks
Shashikant Shinde: "आर. आर. पाटलांसारखं काम करुन दाखवणार, वेळ पडली तर...."; प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होताच शशिकांत शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका

बैठक कशासाठी होती?

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर दोन दिवसांपूर्वी शाई हल्ला झाला होता, या हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चे आणि आंदोलनं कशी करायची? यासंदर्भातील बैठक इथं आयोजित करण्यात आली होती. यामध्ये प्रत्येक विचारधारेचे मराठा तरुण आपली भूमिका मांडत होते. यावेळी एक अॅड. बावडे नावाच्या एका मराठा तरुणानं आपली भूमिका मांडताना हा शाई हल्ला करणाऱ्या दीपक काटे याचं आणि अमोल भोसले यांचं काय कनेक्शन आहे? असा प्रश्न विचारला. त्यानंतर अमोल भोसले यांचे समर्थक चिडले आणि त्यांनी या तरुणाला मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर या ठिकाणी एकच गोंधळ माजला आणि दोन गटांमध्ये तुफान हाणामारी पाहायला मिळाली.

Solapur Rucks
Prakash Mahajan: मनसेनं डावललं! इगतपुरीच्या शिबिराला निमंत्रण नाही; प्रकाश महाजनांनी बोलून दाखवली मनातील खदखद

यामुळं जी बैठक आयोजित करण्यात आली होती, ती पूर्णपणे फिस्कटल्याचं चित्र दिसून आलं. त्यामुळं काहीसं तणावपूर्ण वातावरणही निर्माण झालं होतं. ज्या तरुणाला मारहाण करण्यात आली होती त्याला बैठकीतील काही मराठा बांधवांनी सुरक्षितरित्या बाहेर काढलं, यावेळी घटनास्थळी पोलीसही उपस्थित नव्हते. यावेळी 'छत्रपती शिवाजी महराज की जय' अशा घोषणाही देण्यात आल्या. पण घटनास्थळी पोलीस फाटा पोहोचल्यानंतर ही बैठक पूर्ववत करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न सुरु झाला.

Solapur Rucks
Kolhapur News: राजकारणाचा गियर पडला! कोल्हापुरात भाजपचा पहिला दणका; मुश्रीफांचा गडी फोडला

नेमकी वादाची ठिणगी कशी पडली?

प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई हल्ला करणाऱ्या दीपक काटेला पोलीस ताब्यात घेण्यासाठी आले तेव्हा तिथं अक्कलकोटचे स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे जन्मंजय भोसले यांचे पुत्र अमोल भोसले यांचा दीपक काटेसोबत संवाद सुरु होता. या संवादाची व्हिडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याअनुषंगानं जन्मंजय भोसले यांना आपण महाराज किंवा राजे संबोधणार नाही. तसंच अमोल भोसले यांचा दीपक काटेशी काय संवाद झाला? असा प्रश्न त्यानं विचारला. त्यातूनच भोसले समर्थकांच्या भावना दुखावल्या आणि त्यांनी हा संपूर्ण राडा घातला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com