Solapur Nagar Parishad Election : सोलापुरातील दहा नगरपरिषदांसाठी चुरशीनं 63 टक्के मतदान, उमेदवारांची धडधड वाढली

Solapur Election News: सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगर परिषदा आणि एक नगरपंचायतीची निवडणूक (Election) जाहीर झाली होती. पण, मंगळवेढा नगरपरिषद आणि अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे.
Solapur Election news .jpg
Solapur Election news .jpgSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांसाठी मंगळवारी (ता. 2 डिसेंबर) किरकोळ अपवाद वगळता शांततेत अंदाजे 63 टक्के मतदान झाले. थंडीमुळे सकाळच्या सत्रात मतदानाचा जोर कमी होता. मात्र, दुपारी बारानंतर मतदान केंद्रांवर गर्दी दिसू लागली. ती शेवटपर्यंत टिकून होती. तब्बल आठ वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीच्या मतदानात मोठी चुरस दिसून आली.

दरम्यान, ईव्हीएम मशीन वारंवार बंद पडत असल्याने भाजप उमेदवाराच्या पतीने ते जमिनीवर आपटले. अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे त्या बदलावे लागले. त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू झाली. आज लग्नतिथी असल्याने परण्याला आलेल्या नवरदेवाने अगोदर आधी लगीन लोकशाहीचे म्हणत मतदानाचा हक्क बजावला.

सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगर परिषदा आणि एक नगरपंचायतीची निवडणूक (Election) जाहीर झाली होती. पण, मंगळवेढा नगरपरिषद आणि अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. यातील अनगरची निवडणूक बिनविरोध झाल्यात जमा आहे. येथील अपिलावरील सुनावणीचा निकाल वेळेत न आल्याने तेथील निवडणुकीला स्थगिती देण्यात आलेली आहे.

दहा नगरपरिषदांसाठी मंगळवारी (ता. 2 डिसेंबर) सकाळी साडेसातपासून सुमारे 499 केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या तासभरातच मोहोळ, कुर्डुवाडी, सांगोला, अकलूज, बार्शी आणि अक्कलकोट येथील ईव्हीएममध्ये बिघाड झाला होता, त्यामुळे त्या मशीन बदलून मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत करण्यात आली.

Solapur Election news .jpg
Santosh Bangar News: फडणवीसांनी झापलं, गुन्हाही दाखल, आता संतोष बांगर यांची थेट आमदारकीच रद्द करण्याची मागणी समोर

मोहोळ आणि कुर्डुवाडीतील प्रत्येकी दोन केंद्रांवरील मशिनला कनेक्शनचा अडथळा निर्माण झाला होता, त्यामुळे तेथील मशीन बदलून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली. अकलूज, अक्कलकोट, बार्शी आणि सांगोला येथील सात मतदान केंद्रांवरील बॅलेट युनिट बदलून दुसरे लावण्यात आले आहेत. सांगोला येथील तीनही मशिन बदलण्यात आल्या.

Solapur Election news .jpg
Sadabhau Khot : सदाभाऊ खोत निवडणूक आयोगाच्या निर्णयावर भडकले; ‘...मग निवडणुका घेताच कशाला?’

मोहोळ : 71.72

मैंदर्गी : 72.89

अकलूज : 69.25

दुधनी : 70.97

अक्कलकोट :64.25

पंढरपूर : 64.04

करमाळा : 72.78

कुर्डूवाडी :71.00

बार्शी :63.00

सांगोला :78.55

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com