Solapur ZP : अखेर 100 दिवसांनंतर झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांना मिळाली नवी कोरी वाहने

New Vehicle Issue : सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती व पंचायत समिती सभापतींना 100 दिवसांनंतर 13 नवीन चारचाकी वाहने देण्यात आली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते वाहनांचे वितरण झाले.
Jaykumar Gore
Jaykumar GoreSarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 28 June (विठ्ठल सुतार) : सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विविध विषय समित्यांचे सभापती, तसेच पंचायत समित्यांचे सभापती यांना तब्बल 100 दिवसांनंतर नवी कोरी वाहने मिळाली आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते आज (ता. 28 जून) जिल्हा परिषदेचे अध्यक्ष-उपाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांना 13 चारचाकी वाहनांचे वितरण करण्यात आले.

पालकमंत्री गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज वाहनांचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांनी नव्या गाड्या घेण्याबाबतचा निर्णय घेतला होता. आधीची वाहने जुनी झाली होती, त्यामुळे नव्या गाड्यांसाठी पुरेशा निधीची तरतूद करण्यात आली होती, त्यातून या 13 चारचाकी वाहनांची खरेदी करण्यात आली आहे.

झेडपी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसाठी १५ लाखांपर्यंत, तर सभापतींसाठी १२ लाखांपर्यंतची वाहने घेण्यात आली आहेत. जिल्ह्यातील ११ पैकी पाच पंचायत समितीच्या सभापतींची वाहने सुस्थितीत आहेत. उर्वरीत ६ सभापतींकडील वाहने जुनी आहेत, त्यामुळे सहा पंचायत समिती सभापतींसाठी नवीन वाहने खरेदी करण्यात आली आहेत.

पालकमंत्री गोरे म्हणाले, ही गाडी केवळ प्रवासासाठी नसून जनसेवेचे प्रभावी साधन आहे. तिचे प्रत्येक चाक ग्रामीण विकास, लोककल्याण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी फिरले पाहिजे. नवी वाहने क्षेत्रभेटी, विकास कामांचा आढावा, ग्रामस्थांशी थेट संवाद तसेच ग्रामीण भागातील विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपयुक्त ठरणार आहे.

Jaykumar Gore
Solapur News : सोलापूरचे पालकमंत्री लिहिणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; कारण काय?

जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, सभापती ॲड. अमृता वाघे, रामप्पा चिवडशेट्टी, चेतनसिंह केदार, संस्कृती सातपुते यांच्यासह दक्षिण सोलापूर पंचायत समिती सभापती संदीप टेळे, उत्तर सोलापूरच्या सभापती तेजस्विनी बोराडे, माढ्याचे सभापती पंडित देशमुख, माळशिरसचे सभापती दत्तात्रय मगर, मंगळवेढ्याच्या सभापती दीपाली लाड, सांगोल्याच्या सभापती पूनम इंगवले तसेच करमाळ्याच्या सभापती पूजा ढेरे यांना वाहनांचे वितरण करण्यात आले.

Jaykumar Gore
Omraje Nimbalkar : ओमराजेंनी उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? संजय राऊतांनी यादीच वाचली...

या वेळी आमदार देवेंद्र कोठे, जिल्हा परिषद सदस्य आदिनाथ देशमुख, बालाजी नरोटे व मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

 dhairyasheel mohite patil
Jaykumar Gore
Solapur Leader Meet Jaykumar Gore
Jaykumar Gore
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com