

महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांना राष्ट्रीय बाजाराचा दर्जा देण्याची चर्चा सुरू असून, अंतिम निर्णयाचा अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे.
या निर्णयामागे राजकीय तडजोडीचे संकेत दिसत असून, सोलापूर बाजार समिती आणि माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाशी याचा संबंध जोडला जात आहे.
पणन विभागाने स्पष्ट केले की अद्याप कोणतीही अधिसूचना जाहीर झालेली नाही, आणि फक्त पात्र समित्यांची यादी तयार करण्यात आली आहे.
Solapur, 01 November (संदीप गायकवाड ) : राज्यातील प्रमुख बाजार समित्या राष्ट्रीय बाजार म्हणून अस्तित्वात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. हा निर्णय झाल्यास या बाजार समितीवरील विद्यमान संचालक मंडळ बरखास्त होणार आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांकडे ठेवण्यात आला आहे.
राज्यातील विरोधी पक्षातील नेते मंडळींची भाजपमधील प्रवेशाची धडपड पाहता राष्ट्रीय बाजारचा निर्णय शेतकरी हिताचा न होता राजकीय तडजोडीचा होणार? असे दिसत आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने (Dilip Mane) हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्यामुळे सोलापूर बाजार समितीच्या संचालक मंडळालाही अभय मिळणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यातून मानेंच्या भाजप प्रवेशामागे सोलापूर बाजार समिती असल्याचे दिसून येत आहे.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार दोनपेक्षा अधिक राज्यांमधून हजार टनांहून अधिक शेतीमालाची उलाढाल करणाऱ्या बाजार समित्यांना राष्ट्रीय बाजाराचा दर्जा प्राप्त होणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर, लातूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या आठ प्रमुख बाजार समित्यांचा राष्ट्रीय बाजार या नव्या व्यवस्थेत समाविष्ट होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे आहे.
या संदर्भात आत्तापर्यंत कुठलाही निर्णय झाला नसल्याची माहिती समोर येत आहे, त्यामुळे राष्ट्रीय बाजारचा निर्णय हा फक्त विरोधी पक्षातील नेतेमंडळींना भाजपमध्ये ओढण्यासाठी दबाव वाढवण्यासाठी केलेला खटाटोप असल्याचे दिसून येते.
राष्ट्रीय बाजार संकल्पनेत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश असल्याची चर्चा आहे. या समितीवर सध्या माजी आमदार दिलीप माने यांची सत्ता आहे. माने यांच्या भाजपच्या प्रवेशाची सध्या तयारी सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहे. यामुळे भविष्यात सोलापूर बाजार समितीच्या संचालक मंडळाला अभय मिळणार, असे दिसून येते. राज्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.
या बाजार समित्या म्हणजे मोठे आर्थिक उत्पन्नाचे स्रोत बनल्या आहेत. यामुळे राजकारण्यांना बाजार समितीच्या चाव्या हातात ठेवणे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. यासाठी राजकीय तडजोडी करण्याची तयारी नेतेमंडळींनी दर्शवली आहे. वास्तविक पाहता बाजार समितीच्या व्यवहारात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे. या लुटीतील हिस्सा बाजार समितीच्या प्रत्येक घटकाला मिळत आहे. ही लूट थांबवण्यासाठी राष्ट्रीय बाजार, इ नाम या संकल्पना केंद्र सरकारकडून पुढे केल्या जातात. मात्र, प्रत्यक्षात त्याचा वापर राजकीय सोयीसाठी होताना दिसून येत आहे.
पात्र बाजार समितीची फक्त यादी : पणन संचालक
राष्ट्रीय बाजार समिती योजनेबाबत अद्याप कुठलीही अधिसूचना निघाली नाही. या फक्त माध्यमातील चर्चा आहेत. सध्या फक्त पात्र असणाऱ्या बाजार समितीची यादी तयार झाली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहे, असे राज्याचे पणन संचालक विकास रसाळ यांनी सांगितले.
Q1. कोणत्या बाजार समित्यांना राष्ट्रीय बाजाराचा दर्जा मिळण्याची शक्यता आहे?
A1. मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर, लातूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या आठ समित्यांना.
Q2. राष्ट्रीय बाजाराचा निर्णय कोण घेणार आहे?
A2. अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत.
Q3. या निर्णयावर राजकीय तडजोडीचा आरोप का आहे?
A3. कारण विरोधी पक्षातील नेत्यांच्या भाजप प्रवेशाशी या निर्णयाचा संबंध जोडला जातो आहे.
Q4. पणन संचालकांनी या योजनेबद्दल काय सांगितले?
A4. त्यांनी सांगितले की अद्याप अधिसूचना निघालेली नाही; फक्त पात्र बाजार समित्यांची यादी तयार झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.