Praveen Darekar on MVA Morcha : प्रवीण दरेकरांनी उडविली विरोधकांच्या मोर्चाची खिल्ली; ‘असत्याची पाठराखण करायची अन्‌ नाव....’

MVA-MNS MORCHA MUMBAI : मुंबईत महाविकास आघाडी आणि मनसेच्या ‘सत्याचा मोर्चा’वर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी टीका केली. “असत्याची पाठराखण करून नाव सत्याचा मोर्चा ठेवणे योग्य नाही,” असे त्यांनी म्हटले.
MVA-MNS MORCHA-PRAVEEN DAREKAR
MVA-MNS MORCHA-PRAVEEN DAREKARSarkarnama
Published on
Updated on
  1. मतदारयादीतील घोळाविरोधात महाविकास आघाडी आणि मनसेने मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात सत्याचा मोर्चा काढला, ज्यात उद्धव आणि राज ठाकरे दोघेही सहभागी झाले.

  2. शर्मिला ठाकरे यांनी भाजपवर टीका करत निवडणूक आयोगावर दबाव टाकल्याचा आरोप केला आणि मतदारयादीत गंभीर चुका असल्याचे निदर्शनास आणले.

  3. त्या म्हणाल्या की "निवडणूक आयोग हे भाजपचे कार्यालय नाही", आणि मतदारयाद्या पारदर्शकपणे दुरुस्त करण्याची मागणी केली.

Solapur, 01 November : महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज (ता. 01 नोव्हेंबर) मुंबईत निवडणूक आयागोच्या विरोधात ‘सत्याचा मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चाच्या माध्यमातून विरोधकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. विरोधकांच्या या ‘सत्याचा मोर्चा’ची सत्ताधारी भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी खिल्ली उडवली आहे. ‘असत्याची पाठराखण करायची आणि नाव सत्याचा मोर्चा ठेवायचे, हे बरोबर नाही,’ अशा शब्दांत दरेकरांनी विरोधकांवर हल्ला चढविला आहे.

प्रवीण दरेकर (Praveen Darekar ) म्हणाले, मतदारयाद्यांमध्ये चुका असतील तर दुरुस्ती झाली पाहिजेत आणि हे सुरूच असतं. मात्र विरोधकांच्या मोर्चाच्या मागची भावना ही मतदार यादी नसून मिळणारे अपयश आहे. पराभवाची कारण हे मतदार याद्या असव्यात, यासाठी हे केलं जातं. लोकसभा निवडणुकीमध्ये देखील हेच ईव्हीएम होते, त्यामुळे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आता विरोधी पक्षावर आली आहे. नौटंकी करण्यापेक्षा काम केलं पाहिजे.

विरोधकांमध्ये एकी आहेत म्हणतात मग खरंच एकी आहे का? सर्वांचीच तोंडं वेगवेगळ्या दिशेला आहेत. मारून मुटकून आणलेले आणि गोंधळलेले विरोधक आहेत, असा टोलाही दरेकरांनी विरोधकांना लगावला.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या लोकल प्रवासाबाबत बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, ‘लोकल’ने तर सर्वसामान्य लोकंही दररोज प्रवास करतात. यात वेगळं काही नाही, किमान लोकांच्या समस्या तरी त्यांना समजतील. जगावेगळं काही त्यांनी केलंय, असं मला वाटत नाही.

MVA-MNS MORCHA-PRAVEEN DAREKAR
Sharmila Thackeray : शर्मिला ठाकरे भाजपवर प्रथमच कडाडल्या; ‘मूक आंदोलन आहे तर मूकपणे करा; किती बडबड करता?’

काँग्रेस पक्षाचे मुंबईतील आमदार भाई जगताप यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची वेगळी भूमिका आहे. निवडणूक आयोगाच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चाबाबत विरोधकांमध्ये एकीचा सूर अजिबात नाही. संभ्रमावस्थेत असलेला विरोधी पक्ष आहे, अशी टीकाही दरेकरांनी केली.

सिंकदर शेखला गोवण्याचा प्रयत्न आम्ही होऊ देणार नाही : दरेकर

सिकंदर शेख याच्यावर पंजाबमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत प्रवीण दरेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पंजाबचे पोलिस काय प्रकरण आहे, हे जाणून घेतील. त्यानंतरच कारवाई होईल. पण जर कोणी गोवण्याचा प्रयत्न करत असेल तर तसं होऊ नये, अशी आमची भूमिका असेल.

MVA-MNS MORCHA-PRAVEEN DAREKAR
Pune Politics : पुण्यातून राजकारण फिरणार: दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत चर्चा; पवारांची राष्ट्रवादी सोबतीला

Q1. सत्याचा मोर्चा कोणत्या विषयावर काढण्यात आला?
A1. मतदारयादीतील घोळ आणि अनियमिततेविरोधात निवडणूक आयोगाच्या निष्क्रियतेवर मोर्चा काढला गेला.

Q2. या मोर्चात कोणते प्रमुख नेते सहभागी झाले?
A2. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे यांसारखे प्रमुख नेते सहभागी झाले.

Q3. शर्मिला ठाकरे यांनी कोणावर टीका केली?
A3. त्यांनी भारतीय जनता पक्षावर आणि निवडणूक आयोगावर कठोर टीका केली.

Q4. मोर्च्याचा मुख्य उद्देश काय होता?
A4. मतदारयादीतील त्रुटी दूर करून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक करण्याची मागणी करणे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com