Sharmila Thackeray : शर्मिला ठाकरे भाजपवर प्रथमच कडाडल्या; ‘मूक आंदोलन आहे तर मूकपणे करा; किती बडबड करता?’

Satyacha Morcha News : मतदारयादीतील घोळाविरोधात मुंबईत महाविकास आघाडी आणि मनसेचा ‘सत्याचा मोर्चा’ निघाला. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, तर शर्मिला ठाकरे यांनी भाजपच्या मूक आंदोलनावर टीका केली.
Sharmila Thackeray
Sharmila ThackeraySarkarnama
Published on
Updated on
  1. मतदारयादीतील घोळाविरोधात महाविकास आघाडी आणि मनसेने मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात सत्याचा मोर्चा काढला, ज्यात उद्धव आणि राज ठाकरे दोघेही सहभागी झाले.

  2. शर्मिला ठाकरे यांनी भाजपवर टीका करत निवडणूक आयोगावर दबाव टाकल्याचा आरोप केला आणि मतदारयादीत गंभीर चुका असल्याचे निदर्शनास आणले.

  3. त्या म्हणाल्या की "निवडणूक आयोग हे भाजपचे कार्यालय नाही", आणि मतदारयाद्या पारदर्शकपणे दुरुस्त करण्याची मागणी केली.

Mumbai, 01 November : मतदारयादीतील घोळाविरोधात महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विरोधात मुंबईत आज (ता. ०१ नोव्हेंबर) निवडणूक आयोगाच्या विरोधात सत्याचा मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चात महाविकास आघाडीचे महत्वाचे सर्व नेते सहभागी झाले आहेत. राज आणि उद्धव ठाकरे हे बंधूचाही सहभाग आहे. राज ठाकरेंंचे संपूर्ण कुटुंब या मोर्चात चालत असून मोर्चात सहभागी झालेल्या राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी भाजपकडून करण्यात येत असलेल्या मूक आंदोलनावर जोरदार शरसंधान साधले.

निवडणूक आयोगाच्या (Election Commission) विरोधात काढण्यात येत असलेल्या मोर्चात ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, भाई जगताप, शशिकांत शिंदे, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, शेकापचे जयंत पाटील, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, बाळा नांदगावकर, अरविंद सावंत हे सर्व प्रमुख नेते सहभागी झाले आहेत.

या सत्याच्या मोर्चात राज ठाकरे यांचे संपूर्ण कुटुंबीय सहभागी झाले आहेत. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) याही या मोर्चात चालत आहेत. या मोर्चात चालताना त्यांनी भारतीय जनता पक्षावर पहिल्यांदाच शरसंधान साधताना आढळल्या आहेत. मतदारयादीतील घोळाबाबत त्यांनी सत्ताधारी महायुतीच्या मंत्र्यांचा दाखल देत निवडणूक आयोगाला सुनावले आहे.

शर्मिला ठाकरे म्हणाल्या, निवडणूक आयोगाच्या सत्याचा मोर्चाचे पडसाद किती उमटतील, याबाबत माहिती नाही. पण महायुती सरकारमधील मंत्री हसन मुश्रीफ हेही आता बोलले आहेत की, मतदारयादीत काही घोळ असेल तर ते दुरुस्त केले पाहिजेत, असे ते म्हणाले आहेत. त्यामुळे सत्ताधारीही मतदारयाद्यांमध्ये घोळ असल्याचे मान्य करत आहेत.

Sharmila Thackeray
MNS And MVA Satyacha Morcha : सत्याचा मोर्चापासून सपकाळ अन् गायकवाड दूर? काय प्रॉब्लम आहे?

मतदारयादीत एका महिलेचे नाव पंचवीस वेळा आलेले आहे. एका घरात तीनशे माणसं आहेत, त्यामुळे आमचं एवढंच म्हणणं आहे की, मतदारयाद्या नीट करा. पण त्याला भारतीय जनता पक्ष आक्षेप का घेत आहे. आमचा तेवढाच प्रश्न आहे, असा टोला शर्मिला ठाकरेंनी भाजपला लगावला.

त्या म्हणाल्या, आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारत आहोत. निवडणूक आयोग म्हणजे भाजपचे ऑफीस नाही. ना कुठच्या सत्ताधारी पक्षाचे ऑफीस आहे. आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नाला निवडणूक आयोगाने उत्तर द्यावे. त्यावर इतरांनी उत्तर देऊच नये. आयोगाने फक्त मतदारयाद्या नीट कराव्यात.

भाजपच्या मूक आंदोलनावर टीका करताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, भाजपच्या लोकांनी मूकच आंदोलन करावं. ते किती बडबड करत आहेत. त्यांना म्हणावं मूकच आंदोलन करा. ते बडबडता आहेत किती? आमचा मोर्चा भाजपच्या विरोधात नाहीच. आमचा मोर्चा निवडणूक आयोगाच्या विरोधात आहे. नाही तर तुम्ही सांगा तरी निवडणूक आयोग म्हणजे भाजपचे ऑफीस आहे.

Sharmila Thackeray
BJP setback: भाजपला धक्का! शिंदे, अजितदादांच्या मंत्र्यांचे सूर बदलले, विरोधकांच्या मतचोरीविरोधाला बळ मिळणार?

Q1. सत्याचा मोर्चा कोणत्या विषयावर काढण्यात आला?
A1. मतदारयादीतील घोळ आणि अनियमिततेविरोधात निवडणूक आयोगाच्या निष्क्रियतेवर मोर्चा काढला गेला.

Q2. या मोर्चात कोणते प्रमुख नेते सहभागी झाले?
A2. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे यांसारखे प्रमुख नेते सहभागी झाले.

Q3. शर्मिला ठाकरे यांनी कोणावर टीका केली?
A3. त्यांनी भारतीय जनता पक्षावर आणि निवडणूक आयोगावर कठोर टीका केली.

Q4. मोर्च्याचा मुख्य उद्देश काय होता?
A4. मतदारयादीतील त्रुटी दूर करून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक करण्याची मागणी करणे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com