काही जणांना मुंगेरीलालचे हसीन सपने पाहण्याची सवय : त्यांना स्वप्न पाहू द्यावे...

पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना येथे आज गणेश चतुर्थी निमित्त गणरायाची प्रतिष्ठापणा राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) व शालिनी विखे पाटील ( Shalini Vikhe Patil ) यांच्या हस्ते करण्यात आली.
Radhakrishna Vikhe Patil & Shalini Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil & Shalini Vikhe Patil Paresh Kapse
Published on
Updated on

Radhakrishna Vikhe Patil : प्रवरा उद्योग समुहातर्फे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना येथे आज गणेश चतुर्थी निमित्त गणरायाची प्रतिष्ठापणा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) व त्यांच्या पत्नी शालिनी विखे पाटील ( Shalini Vikhe Patil ) यांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमानंतर उपस्थित पत्रकारांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, दोन वर्षांच्या कोविड संकटानंतर गणरायाचे आज उत्साहात आगमन झाले. त्यामुळे गणेशोत्सवाला यंदा वेगळे महत्त्व आहे. राज्यातील जनतेच्या मनातील सरकार सत्तेत आले आहे. मागील अडीच वर्षांत राज्य पूर्णपणे ठप्प झाले होते. त्यामुळे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गणरायाने आशीर्वाद द्यावेत, आम्हा सर्वांना काम करण्यासाठी नवी ऊर्जा गणरायाने द्यावी, अशी प्रार्थना त्यांनी गणरायाकडे केली.

Radhakrishna Vikhe Patil & Shalini Vikhe Patil
शालिनी विखे नाही, कमळाचाच अध्यक्ष होणार: शिवाजी कर्डिले 

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार लवकरच जाईल, असे विरोधकांकडून सांगण्यात येते. यावर त्यांनी सांगितले की, पूर्वी मुंगेरीलाल के हसीन सपने नावाची टिव्ही मालिका होती. त्यांना त्या हसीन सपन्यांतच राहू द्यावे. ते लोक आता दुःखीत चेहरे घेऊन बाहेर फिरत आहेत. त्यांना स्वप्न पाहण्यात मानसिक समाधान मिळत असेल तर काही हरकत नाही, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

Radhakrishna Vikhe Patil & Shalini Vikhe Patil
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, खंडणी वसुलीत आघाडी सरकार पटाईत

महाविकास आघाडीच्या काळात रखडलेल्या विकास योजना, कोविडमध्ये एकही निर्णय जनतेच्या बाजूने होऊ शकला नाही. शिंदे-फडणवीस सरकारने कोविड काळातील मृत्युमुखी पडलेल्यांच्या पाल्यांचे पद्वीपर्यंतचे मोफत करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ते म्हणत होते, आमचे तुमची जबाबदारी. आता आमच्या सरकारनेच राज्याची सर्व जबाबदारी घेतली आहे. त्याचे दायित्व आम्ही शंभर टक्के निभावणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com