Pravin Gaikwad Attack : प्रवीण गायकवाडांना धक्काबुक्की; काटेसह सात जणांचे थेट पोलिस अधीक्षक घेणार चांगल्या वर्तनाचे बंधपत्र

Akkalkot Incident : एरव्ही पोलिस उपअधीक्षकांसमोर संशयित आरोपींना उभे केले जाते आणि त्यांच्याकडून चांगल्या वर्तनाचे बंधपत्र घेतले जाते. मात्र, गायकवाड हल्लाप्रकरणी संशयित आरोपींना आता थेट पोलिस अधीक्षकांसमोर उभे करण्यात येणार आहे.
Pravin Gaikwad Attack
Pravin Gaikwad AttackSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 14 July : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना शाई फासून धक्काबुक्की केल्याच्या प्रकरणात शिवधर्म प्रतिष्ठानचे दीपक काटे याच्यासह सात जणांच्या विरूद्ध अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्या सात संशयितांना पोलिस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांनी काही तास ताब्यात ठेवले होते. त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावली आहे. आता त्या सर्वांना पोलिस उपअधीक्षकांऐवजी थेट पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासमोर हजर केले जाणार आहे, असा प्रकार पहिल्यांदाच होत आहे.

पोलिस (Police) निरीक्षक राजेंद्र टाकणे म्हणाले, आम्ही वेळेत घटनास्थळी दाखल झाल्याने अनर्थ टळला, नाहीतर काहीही होऊ शकले असते. संशयितांना आता पोलिस अधीक्षकांसमोर हजर करून त्यांच्याकडून चांगल्या वर्तनाचे बंधपत्र घेतले जाणार आहे. दाखल गुन्ह्यातील कलमांन्वये संशयितांना अटक होऊ शकत नाही. त्या कलमांनुसार संशयितांना सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असून सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशानुसार त्यांना अटक होऊ शकत नाही.

या सर्व सातही जणांना आता पोलिस अधीक्षक (SP) कुलकर्णी यांच्यासमोर उभे करण्यात येणार आहे. एरव्ही पोलिस उपअधीक्षकांसमोर संशयित आरोपींना उभे केले जाते आणि त्यांच्याकडून चांगल्या वर्तनाचे बंधपत्र घेतले जाते. मात्र, गायकवाड हल्लाप्रकरणी संशयित आरोपींना आता थेट पोलिस अधीक्षकांसमोर उभे करण्यात येणार आहे.

दीपक काटे आणि त्याच्या सहकाऱ्याकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेतले जाणार आहे, त्यानंतर त्यांना सोडून दिले जाणार आहे, त्यामुळे संभाजी ब्रिगेडचे पुढची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Pravin Gaikwad Attack
Pravin Gaikwad Attack : प्रवीण गायकवाडांवर हल्ला करणारा दीपक काटे कोण आहे? लोहगाव विमानतळावर त्याला का अटक झाली होती?

दरम्यान, अक्कलकोट येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या सत्कारनिमित्त प्रवीण गायकवाड हे रविवारी (ता. १३ जुलै) पत्नीसह अक्कलकोटला आले होते. गाडीतून उतरून ते कार्यक्रमस्थळी जात असताना इंदापूरहून अक्कलकोटल आलेले दीपक काटे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी प्रवीण गायकवाड यांच्या अंगावर काळी शाई ओतली. त्यानंतर गायकवाड हे आपल्या गाडीत जाऊन बसले होते. मात्र, दीपक काटे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्यांना गाडीतून ओढून बाहेर काढत त्यांना धक्काबुक्की केली हेाती.

Pravin Gaikwad Attack
Pravin Gaikwad Attack : हल्ल्यानंतर प्रवीण गायकवाडांचा इशारा; ‘अक्कलकोटमध्ये माझ्या हत्येचा कटच होता; पण लक्षात ठेवा, ही शेवटाची सुरुवात आहे’ (video)

संभाजी ब्रिगेडचे सोलापूर जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले यांनी अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार दीपक काटे याच्यासह किरण साळुंखे (रा. भवानी नगर, इंदापूर, जि. पुणे), भैय्या ढाणे (रा. भवानी नगर, इंदापूर, जि. पुणे), कृष्णा क्षीरसागर (रा. कसबा, बारामती शहर, जि.पुणे), अक्षय चव्हाण (रा. तांदूळवाडी, बारामती, जि. पुणे), बाबू बिहारी (रा. तांदूळवाडी, ता. बारामती, जि. पुणे), भवानेश्वर बबन शिरगिरे (रा. इंदापूर, जि. पुणे) या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com