Rajan Patil : अजितदादांना मोठा धक्का; राज्यमंत्री केलेल्या राजन पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट

Rajan Patil Meet Sharad Pawar : शरद पवार हे देशाचे नेते असून त्यांना भेटण्यात गैर काय असा सवाल राजन पाटील यांनी केला आहे. मला अजित पवारांनी जरी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष केले असले तरी शरद पवार हे आमचे नेते आहेत.
Sharad Pawar-Rajan Patil-Ajit Pawar
Sharad Pawar-Rajan Patil-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 29 September : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेले राज्य सहकार परिषदेचे अध्यक्षपद दिलेले मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील हे अवघ्या दोनच दिवसांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटायला अकलूजमध्ये पोहोचले आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादांना हा मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे राजन पाटील यांनी या भेटीचे समर्थनही केले आहे.

मोहोळमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी राजन पाटील (Rajan Patil) यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेले राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष केले आहे. त्यावरून पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली होती. तो विषय ताजा असतानाच आता राजन पाटील यांनीच शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी शरद पवार (Sharad Pawar)हे आज अकलूजमध्ये आले आहेत. त्यांना भेटण्यासाठी माजी आमदार राजन पाटील हे अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर पोहोचले आहेत. त्यांनी पवारांची भेटही घेतली आहे. या भेटीचे राजन पाटील यांनी समर्थनही केले आहे.

Sharad Pawar-Rajan Patil-Ajit Pawar
Madha Politics : ...नाही तर माढा अन्‌ करमाळ्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार पाडू; उमेदवारीसाठी साठे गट आक्रमक

शरद पवार हे देशाचे नेते असून त्यांना भेटण्यात गैर काय असा सवाल राजन पाटील यांनी केला आहे. मला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जरी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष केले असले तरी शरद पवार हे आमचे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्या भेटीला आलो आहे. असे सांगताना लोकसभेला जनतेने काँग्रेससाठी मतदान केले, असे संकेतही राजन पाटील यांनी दिले आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ताकद दिलेला नेता शरद पवार यांच्या भेटीला जाणे ही अजित पवार यांच्यासाठी धक्कादायक गोष्ट मानली जात आहे. याच मुद्यावरून उमेश पाटील यांनी काही सवाल उपस्थित केले होते. सत्ता नसती तर राजन पाटील हे अजित पवार यांच्यासोबत आले असते का, असा खडा सवाल त्यांनी केला होता.

Sharad Pawar-Rajan Patil-Ajit Pawar
Akluj Melava :लोकसभेप्रमाणे विधानसभेचीही रणनीती अकलूजमध्येच ठरणार; मातब्बर चार नेते येणार एकत्र!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ताकद देऊनही राजन पाटील हे शरद पवारांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आता उमेश पाटील आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून यावर काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com