Akluj Melava :लोकसभेप्रमाणे विधानसभेचीही रणनीती अकलूजमध्येच ठरणार; मातब्बर चार नेते येणार एकत्र!

Mahavikas Aghadi : लोकसभा निवडणुकीपूर्वीही अकलूजमध्ये शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील या मातब्बर नेत्यांमध्ये डिनर डिप्लोमसी झाली होती. पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला शिकस्त देण्याची रणनीती त्याच बैठकीत ठरली होती.
Sharad Pawar-Sushilkumar Shinde-Vijayshinh Mohite Patil
Sharad Pawar-Sushilkumar Shinde-Vijayshinh Mohite Patil Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 28 September : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोहिते पाटलांच्या अकलूजमध्ये पुन्हा एकदा राजकीय नेत्यांचा मेळा भरणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा वाढदिवस आणि महाराष्ट्रातील नवनिर्वाचित खासदारांच्या सत्कार समारंभाचे निमित्त असले तरी या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्रमुख नेत्यांवरून हा मेळावा महाविकास आघाडीचा असणार, हे स्पष्ट होत आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीतीही अकलूजमधूनच ठरणार, असे या कार्यक्रमावरून दिसत आहे.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अकलूज (ता. माळशिरस) येथे उद्या (ता. 29 सप्टेंबर) राज्यातील नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार करण्यात येणार आहे.

याच कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते शिंदे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील (Vijayshinh Mohite Patil) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याशिवाय महाविकास आघाडीतील आमदार आणि खासदारांची ह्या कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे.

कार्यक्रमाला येणाऱ्या प्रमुख नेत्यांची नावे लक्षात घेता हा महाविकास आघाडीचा कार्यक्रम असल्याचे स्पष्ट होते. लोकसभा निवडणुकीपूर्वीही अकलूजमध्ये शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील या मातब्बर नेत्यांमध्ये डिनर डिप्लोमसी झाली होती.

त्यानंतर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी अधिक आक्रमक झाली होती. पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला शिकस्त देण्याची रणनीती त्याच बैठकीत ठरली होती. त्यानुसार महायुतीला चारीमुंड्या चित करत महाविकास आघाडीने राज्यात 30 जागा जिंकण्यात यश मिळवले होते.

Sharad Pawar-Sushilkumar Shinde-Vijayshinh Mohite Patil
Karmala Politics : संजय शिंदेंपासून जयवंतराव जगताप दुरावलेत का? निमंत्रण असूनही अजितदादांच्या दौऱ्याला दांडी

माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना तिकीट नाकारल्यानंतर मोहिते पाटील यांनी भाजपचा दबाव झुगारत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून धैर्यशील मोहिते पाटील हे माढ्यातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणेच अकलूजमध्ये पुन्हा एकदा हे तीन मातब्बर नेते एकत्र येत आहेत.

Sharad Pawar-Sushilkumar Shinde-Vijayshinh Mohite Patil
Praful Patel : लोकसभेतील पराभवाचा प्रफुल पटेलांचा राग जाईना; ‘तुमचा खासदार ‘बाबाजीचा ठेंगा’ देणार’

आताही विधानसभा निवडणूक तोंडावर असून या निवडणुकीची रणनीती काय असावी, यासंदर्भात राज्यातील प्रमुख नेते मंडळींच्या सध्या बैठका सुरू आहेत, त्याच अनुषंगाने अकलूजमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. या सत्कार समारंभाला महाविकास आघाडीचे तीस खासदार वगळता इतर खासदारही उपस्थिती लावणार का? हा खरा प्रश्न आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com