Dilip Mane : दिलीप मानेंच्या भाजप प्रवेशापूर्वी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण काढणार सुभाष देशमुखांची समजूत

Subhash Deshmukh opposes Dilip Mane's BJP Entry : माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला सोलापूर दक्षिणेत विरोध झाला असून कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. सुभाष देशमुखांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी आता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर आहे.
Dilip Mane-Subhash Deshmukh-Ravindra Chavan
Dilip Mane-Subhash Deshmukh-Ravindra ChavanSarkarnama
Published on
Updated on
  1. माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला दक्षिण सोलापूरमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला असून शहर कार्यालयासमोर धरणे आंदोलन झाले.

  2. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माने यांचा पक्षप्रवेश निश्चित असल्याचे सांगितले असून सुभाष देशमुखांची नाराजी दूर करण्याचे आव्हान त्यांच्या समोर आहे.

  3. दिलीप माने यांनी मात्र स्पष्ट केले की, त्यांनी भाजप नेत्यांशी प्रवेशाबाबत कोणताही संपर्क साधलेला नाही.

Solapur, 31 October : काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला दक्षिण सोलापूर मतदारसंघातील पक्ष पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. तो दर्शविण्यासाठी अगोदर भाजपच्या सोलापूर शहर कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कानावरही नाराजी घालण्यात आली. मात्र, मानेंचा पक्षप्रवेश होणार हे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनीच स्पष्टपणे सांगितले. मात्र, आता सुभाष देशमुखांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी प्रदेशाधक्ष चव्हाणांच्या खांद्यावर असणार आहे

माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane) यांचा भारतीय जनता पक्षातील प्रवेश निश्चित झाला आहे. मानेंचा भाजप प्रवेश येत्या आठ किंवा दिवसांत होणार असल्याची माहिती आहे. मात्र, त्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र, मानेंच्या भाजप प्रवेशावरून सोलापूर भाजपमध्ये मोठे महाभारत घडले आहे. आता त्यावर भाजपश्रेष्ठी कसा तोडगा काढतात, हे पाहावे लागणार आहे.

दिलीप माने यांच्या भाजप पक्षप्रवेशाच्या विरोधात सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मुंबईत जाऊन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांची भेट घेऊन आपल्या भावना मांडल्या. तेव्हा प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी ‘माने यांचा प्रवेश निश्चितपणे होणार आहे. मात्र, आपल्यावर अन्याय होणार नाही याची काळजी पक्ष घेईल,’ अशी ग्वाही त्यांनी दिली.

रवींद्र चव्हाण यांनी अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली असली तरी आपल्या हक्काचे द्यावे लागणार, हे भाजप कार्यकर्त्यांच्या मनात आहे. आपला वाटा कमी होणार, हे त्यांनी आता मान्य केले आहे, असे दिसून येते. त्यामुळे आमदार देशमुख यांचे भाजपमधील समर्थक हवालदिल झाले आहेत.

Dilip Mane-Subhash Deshmukh-Ravindra Chavan
Rajan Patil : भाजपमध्ये प्रवेश करताच राजन पाटलांना पाठबळ देण्यासाठी फडणवीस मोहोळमध्ये येणार

दिलीप माने यांचा भाजप प्रवेश येत्या आठ- दहा दिवसांत होणार आहे. त्या अगोदर प्रदेशाध्यक्ष चव्हाण हे आमदार सुभाष देशमुख यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यानंतर माने यांच्या भाजप प्रवेशाची तारीख नक्की होणार असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

भाजप प्रवेशासाठी मी कोणाशीही संपर्क साधलेला नाही : माने

मी पक्ष प्रवेशाबाबत भाजप प्रदेशाच्या कोणत्याही नेत्यांशी संपर्क साधलेला नाही. त्यांनीही अद्याप मला कोणताही निरोप दिलेला नाही, त्यामुळे त्याबाबत मला काहीही माहिती नाही, असे माजी आमदार तथा सोलापूर बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी स्पष्ट केले.

Dilip Mane-Subhash Deshmukh-Ravindra Chavan
Satara Politic's : आमदार महेश शिंदे-शशिकांत शिंदेंसाठीच्या प्रतिष्ठेची लढतीतील विजयाची चावी गोरेंच्या हाती!

Q1. दिलीप माने कोणत्या पक्षात प्रवेश करणार आहेत?
A1. दिलीप माने भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार आहेत.

Q2. त्यांच्या प्रवेशाला विरोध कोणी केला आहे?
A2. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे.

Q3. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काय भूमिका घेतली?
A3. त्यांनी सांगितले की माने यांचा प्रवेश निश्चित आहे आणि कोणावरही अन्याय होणार नाही.

Q4. दिलीप माने यांनी पक्षप्रवेशाबाबत काय म्हटले?
A4. त्यांनी स्पष्ट केले की भाजप नेत्यांशी त्यांनी कोणताही संपर्क साधलेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com