Barshi Politic's : सोलापुरातील कट्टर राजकीय विरोधकांचा एसटीतून एकत्र प्रवास; दावे मात्र वेगवेगळे!

Dilip Sopal- Rajendra Raut News : बार्शी आगारासाठी तब्बल 10 वर्षांनंतर नव्या कोऱ्या दहा एसटी बस उपलब्ध झाल्या आहेत. अशोक लेलॅन्ड कंपनीच्या बीएस सहा प्रणालीच्या या अत्याधुनिक एसटी बसेस बार्शी आगाराला मिळाल्या आहेत.
Dilip Sopal- Rajendra Raut
Dilip Sopal- Rajendra RautSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 09 February : महाराष्ट्रातील काही मतदारसंघाचे राजकारण हे कायमच ‘काँटे की टक्कर’ असते, तुल्यबळ नेते कायमच एकमेकांना आव्हान देत असतात. त्यातील एक म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी. बार्शी तालुक्यात आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यात तुल्यबळ लढाई असते. एरवी एकमेकांशी न बोलणाऱ्या या दोन नेत्यांनी चक्क एकाच एसटी बसमधून प्रवास केला. एकत्रित प्रवास केलेल्या या दोन नेत्यांनी दावे मात्र वेगवेगळे केले आहेत.

बार्शी आगारासाठी तब्बल १० वर्षांनंतर नव्या कोऱ्या दहा एसटी बस उपलब्ध झाल्या आहेत. अशोक लेलॅन्ड कंपनीच्या बीएस सहा प्रणालीच्या या अत्याधुनिक एसटी बसेस बार्शी आगाराला मिळाल्या आहेत. या नव्या कोऱ्या एसटी बस गाड्यांचे पूजन आमदार दिलीप सोपल (Dilip Sopal) आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

लांब पल्ल्याच्या मार्गासाठी आणि सोलापूर बार्शी या मार्गावर या अत्याधुनिक अशा एसटी बस वापरण्यात येणार आहेत. त्याचा बार्शी-सोलापूर असा दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार आहे. तसेच, विद्यार्थ्यांनाही याचा चांगला उपयोग होणार आहे. आणखी एसटी बस उपलब्ध झाल्याने बार्शी आगारावरचा ताणही कमी होणार आहे.

आमदार सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांच्या हस्ते पूजन करून बसचे उद्‌घाटन करण्यात आले. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी एकाच एसटी बसमध्ये बसून एकत्रित प्रवास केला. काही काळापुरते तरी का होईना हे दोन कट्टर विरोधक एकत्र आले होते. एकत्रित प्रवासानंतर मात्र या दोन्ही नेत्यांनी वेगवेगळे दावे केले आहेत. त्यामुळे बार्शीत श्रेयवाद नव्याने पेटला आहे.

Dilip Sopal- Rajendra Raut
Delhi Assembly Result : काँग्रेस नेते संदीप दीक्षितांनी घेतला आईच्या पराभवाचा बदला; केजरीवालांच्या पराभवात उचलला वाटा!

बार्शी आगाराला मिळालेल्या या नव्या करकरीत एसटी बस कोणामुळे उपलब्ध झाल्या, याचा श्रेयवाद आता तालुक्यात रंगला आहे. एकत्र प्रवास करणारे दिलीप सोपल आणि राजेंद्र राऊत यांनी एसटी बस आपल्यामुळेच मिळाल्या आहेत, असा दावा केला आहे. आमदार दिलीप सोपल यांनी ‘मंत्री प्रतापराव सरनाईक यांना भेटून नवीन एसटी बसची मागणी केली होती. मंत्री सरनाईक यांनी मागणी मान्य करत बार्शीकरांची सोय केल्याबद्दल प्रतापराव सरनाईक यांचे आभार’ अशी पोस्ट करून आपल्या मागणीमुळे बस उपलब्ध झाल्याचा दावा केला आहे.

दुसरीकडे, माजी आमदार राजेंद्र राऊत यांनीही एसटी बस आपल्यामुळेच मिळाल्याचा दावा केला आहे. बार्शी आगारातील एसटी बसेसची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांची व प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता मी गेली ६ महिने नवीन बसेसच्या मागणीचा सतत पाठपुरावा करत होतो. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे २२ ऑगस्ट २०२४ रोजी राज्य सरकारच्या परिवहन महामंडळाकडून नवीन ’३० एसटी बसेस’ बार्शी आगारास द्याव्यात, अशी मागणी केली होती. त्यानुसार या दहा बस दिल्या आहेत, असा दावा केला आहे.

Dilip Sopal- Rajendra Raut
Delhi Assembly Result : काँग्रेसने आपचा बदला घेतला....तब्बल 14 जागांवर केले नुकसान

लवकरच उर्वरित नवीन २० बसही मिळाव्यात, यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करणार आहे. सरकारने १० नवीन बस बार्शी आगारास दिल्या, त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे धन्यवाद, अशी पोस्ट करून आपल्यामुळेच बार्शी आगाराला एसटी बस मिळाल्याचा दावा केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com