Narsayya Adam Mastar : सोलापुरात आडम मास्तरांच्या घरावर दगडफेक; संतप्त माजी आमदार म्हणाले ‘माझ्या जिवाला धोका....’

Ex-MLA Narsayya Adam Mastar House attacked in Solapur: भविष्य काळात माझ्यावर प्राणघातक हल्लासुद्धा होऊ शकतो. जनता अनावर झाली तर त्यांना रोखणं माझ्या हातात राहणार नाही. असा प्रकार पुन्हा होणार नाही, यासाठी संबंधितांवर कडक कारवाई करावी.
Narsayya Adam Mastar
Narsayya Adam MastarSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 12 November : विधानसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आलेला असताना सोलापुरात मोठी घटना घडली आहे. सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढविणारे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या घरावर दगडफेक झाली आहे. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून ही दगडफेक झाल्याचा आरोप माजी आमदार आडम यांनी केला असून माझ्या जिवाला धोका आहे, त्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दगडफेकीच्या घटनेनंतर सोलापुरात (Solapur) माकप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वाद-प्रतिवाद रंगण्याची चिन्हे आहेत. माजी आमदार नरसय्या आडम मास्तर हे सायंकाळी पाचनंतर प्रचारासाठी बाहेर पडल्यानंतर ही घटना घडली आहे. दगडफेकीची घटना आडम मास्तर यांच्या पत्नी कामिनी आडम यांनी ही माहिती ॲड. अनिल वासम यांना ही माहिती दिली.

ॲड वासम यांनी तत्काळ पोलिसांनी माहिती देऊन घटनास्थळी आले, त्या वेळीही गोंधळ सुरू होता. दगडफेक करणाऱ्या तरुणांना रोखणाऱ्या वासम यांनाही त्यांनी धक्काबुक्की केली. पोलिसांनी संबंधित तरुणांना ताब्यात घेतले असून तपास करीत आहेत.

Narsayya Adam Mastar
Solapur Election Update: सोलापुरात उद्या मोदी, ठाकरेंची सभा; पंतप्रधानांच्या सभेसाठी 1100 पोलिसांचा बंदोबस्त

दरम्यान, या दगडफेकीनंतर माजी आमदार नरसय्या आडम मास्तर ((Narsayya Adam Mastar)) यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. माझ्या जिवाला धोका आहे, संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ते म्हणाले, सोमवारी (ता. 11 नोव्हेंबर) सायंकाळी पाचच्या सुमारास मी कार्यालयात गेलो. त्या ठिकाणी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यानंतर सभा आणि कॉर्नर बैठका घेतल्या. तोपर्यंत रात्रीचे पावणे अकरा वाजले होते.

बापू नगरमधील कार्यकर्त्यांनी जे की स्वतःला काँग्रेसचे पुढारी समजतात, अशा दोन ते तीन तरुणांनी दारू पिऊन शिवीगाळ करत सोमवारी रात्री आठच्या सुमारास माझ्या घरावर दगडफेक आणि विटा फेकल्या. त्या वेळी काही तरुणांनी त्यांना अडवलं, मात्र त्यांनी अडवणाऱ्या तरुणांनाही धक्काबुक्की केली, असे आडम यांनी सांगितले.

Narsayya Adam Mastar
South Solapur Constituency : दिलीप मानेंसाठी आलेला काँग्रेसचा एबी फार्म कोणी रोखला...कोणाचा होता आदेश?

ते म्हणाले, दरम्यानच्या काळात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अनिल वासम त्या ठिकाणी आले. मात्र, त्यांनाही त्या तरुणांनी धक्काबुक्की केली. तोपर्यंत ही घटना पोलिसांना समजली. माझ्या घरासमोर पोलिस आले, त्यांनी त्या तरुणांना पोलिस ठाण्यात घेऊन गेले आहेत. मात्र, माझी मागणी आहे की भविष्य काळात माझ्यावर प्राणघातक हल्लासुद्धा होऊ शकतो. जनता अनावर झाली तर त्यांना रोखणं माझ्या हातात राहणार नाही. असा प्रकार पुन्हा होणार नाही, यासाठी तातडीने संबंधितांवर कडक कारवाई करावी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com