Shivsena UBT : ठाकरेंची नवी खेळी : शहाजीबापूंच्या गावातील एकनिष्ठ अन्‌ आक्रमक शिलेदारावर सोपवली महत्वाची जबाबदारी...

Sangola-Malshiras Shivsena UBT News : पक्षातील घडामोडींनंतर उद्धव ठाकरे यांनी सांगोला आणि माळशिरसमध्ये संघटन बळकट करण्यास सुरुवात केली असून शहाजीबापू पाटील यांच्या गावातील एकनिष्ठ कार्यकर्त्याकडे महत्त्वाची जबाबदारी दिली.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Sangola, 27 July : एकीकडे खासदार आणि बडे नेते पक्ष सोडून जात असताना उद्धव ठाकरे यांनी खचून न जाता पुन्हा लढण्यासाठी रणशिंग फुंकले आहे. त्यासाठी त्यांनी पक्षसंघटना बळकट करण्यासाठी ‘ग्राऊंड लेवल’वर कामाला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेतून निवडून येऊन एकनाथ शिंदेंसोबत जाणारे सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सांगोल्याकडे ठाकरेंनी विशेष लक्ष दिले आहे. सांगोला आणि माळशिरसची संघटनात्मक जबाबदारी शहाजीबापूंच्या गावातील एकनिष्ठ आणि आक्रमक शिलेदाराच्या खांद्यावर ठाकरेंनी सोपवली आहे.

एकनाथ शिंदे यांची बंडखोरी आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या खासदारांनीही साथ सोडल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याचे दिसून येत आहे. पक्षफुटीनंतर ठाकरेंनी झंझावात उभारत नऊ खासदार निवडून आणले होते. मात्र, मध्यंतरी त्यांनीही शिंदेंच्या गोटात जाण्याचा निर्णय घेत ठाकरेंची साथ सोडली.

गेल्या काही वर्षांपासून ठाकरेंना कमकुवत करण्याची एकही संधी एकनाथ शिंदे आणि भाजपकडून सोडली जात नाही. मात्र, त्याही परिस्थितीत उद्धव ठाकरे हे दोन हात करत लढा देत आहेत. आताही त्यांनी पक्षाची नव्याने बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यासाठी नव्या आणि तरुण खांद्यावर संघटनेची जबाबदारी सोपवली जात आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेच्या सांगोला व माळशिरस विधानसभा मतदारसंघातील नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. यात सांगोला आणि माळशिरस विधानसभा मतदारसंघाच्या 'जिल्हा युवा अधिकारी'पदी चिकमहूदचे खंदे शिवसैनिक सुभाष भोसले यांची निवड करण्यात आली आहे.

Uddhav Thackeray
Satara Dcc Bank Election : 14 मतांच्या पराभवाचा डाग पुसण्यासाठी शंभूराज देसाईंची स्ट्रॉग स्ट्रॅटेजी; पाटणकरही सावध, ठराव झालेले मतदार हलविले अज्ञातस्थळी

सुभाष भोसले यांनी यापूर्वी सांगोला तालुका युवा अधिकारी म्हणून पाच वर्षे काम केले आहे. त्यांच्या निष्ठावान आणि आक्रमक कामाची दखल घेत पक्षाने ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. त्यांच्या निवडीमुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.​

भोसलेंच्या निवडीसोबतच सांगोला तालुक्यातील संघटनात्मक बांधणी सक्षम करण्यासाठी इतरही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यात ​सांगोला तालुका युवा अधिकारी-रघुनाथ गायकवाड, तालुका समन्वयक-संतोष टाकळे, ​सांगोला शहर युवा अधिकारी-सौरभ चव्हाण, उपतालुका युवा अधिकारी-ऋतिक वडे,राहुल आदलिंगे,रणजित रूपनर आणि नितीन लेंडवे. ​विभाग युवा अधिकारी-सागर भादुले (महूद), उमेश गोडसे (कडलास),सचिन शिंदे(जवळा) आणि रणजित भोसले (एखतपूर) यांची निवड करण्यात आली आहे.

Uddhav Thackeray
Satara Politic's : शिवेंद्रराजेंनी निवडणुकीआधीच गेम फिरवला; सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत महत्वाची घडामोड...

या नवीन नियुक्त्यांमुळे सांगोला विधानसभा मतदारसंघात युवासेनेची संघटनात्मक फळी अधिक मजबूत होणार आहे. पक्षश्रेष्ठींनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल नूतन जिल्हा युवा अधिकारी सुभाष भोसले यांनी आभार मानले. पक्षाने दिलेल्या या जबाबदारीचे प्रभावी नियोजन करून, शिवसेनेचा स्वाभिमानी विचार प्रत्येक तरुणापर्यंत व घराघरांपर्यंत पोचविण्याचे काम आम्ही प्रामाणिकपणे करू, अशी ग्वाही भोसले यांनी या वेळी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com