Solapur Politics : खेड्यावरून रंगलेल्या वादावर देशमुखांची नाराजी; 'माझ्या बोलण्याचा ‘ध’चा ‘मा’ केला जातो'

Subhash Deshmuk News : बिल्डर असोसिएशनच्या कार्यक्रमात बोलताना आमदार देशमुख यांनी सोलापूरला मोठं खेडं म्हटलं होतं.
Subhash Deshmukh
Subhash DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : आज मी बोलण्याचं टाळलं होतं, कारण माझ्या प्रत्येक बोलण्याचा ‘ध’ चा ‘मा’ होतो. हेतू न बघता, पूर्ण न वाचता आणि ऐकता सोयीचं तेवढंच घ्यायचं आणि कारण नसताना बदनामी करायची, त्यामुळे मी आज बोलणार नव्हतो, अशी खंत भारतीय जनता पक्षाचे आमदार सुभाष देशमुख यांनी बोलून दाखवली. (Subhash Deshmukh expressed regret over the controversy over the word ’village’)

बिल्डर असोसिएशनच्या कार्यक्रमात बोलताना आमदार देशमुख यांनी सोलापूरला मोठं खेडं म्हटलं होतं. त्याच कार्यक्रमात बोलताना भाजपचेच दुसरे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूरची महती सांगून सुभाषबापूंनी सोलापूरला खेडं का म्हटलं असावं, असा सवाल उपस्थित केला होता. त्यावरून सोलापुरात वादंग उठलं होतं. त्याबाबत सुभाष देशमुख यांनी नाट्य संमलेनाच्या कार्यक्रमात न बोलण्याची भूमिका घेतली होती. मात्र, आयोजकांच्या विनंतीवरून ते बोलले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Subhash Deshmukh
Konkan politics : वैभव नाईकांच्या लढ्याला मोठे यश; विकास कामांवरील स्थगिती कोर्टाने उठवली

सोलापूरला विभागीय नाट्य संमेलन होणार आहे. त्या संमेलनाच्या कार्यालयाचे उद्‌घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्या कार्यक्रमात सुभाष देशमुख बोलत होते. ते म्हणाले की, हेतू न बघता, पूर्ण न वाचता, न ऐकता, जेवढं सोयीचं आहे. तेवढंच घ्यायचं आणि कारण नसताना बदनामी केली जाते. म्हणूनख मला जेव्हा संयोजकांनी बोलायचं का, असं विचारलं तेव्हा मी बोलणार नाही, असे सांगितलं होतं.

मला काम कोणतंही सांगा. काम करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यासाठी जे वाटेल ते काम करण्याची माझी तयारी आहे. कारण बोलणं माझं काम नाही. मी सांस्कृतिक क्षेत्रात नसल्यामुळे तुम्हाला पाहिजेल असं, कानाला रुजल असं, गोड वाटेल असं, दिखाऊ आणि दिशाभूल करणारं, असं मी कधीही बोलणार नाही. जे टिकाऊ असेल तेच मी बोलणार आहे. तेच मी करणार आहे, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.

Subhash Deshmukh
BJP News: मला पक्षातून काढलं तर भष्ट्राचाराचा भांडाफोड करणार; भाजप आमदाराने पक्षाच्या विरोधात ठोकला शड्डू

या विभागीय नाट्य संमेलनाच्या निमित्ताने सोलापूरला एक संधी मिळाली आहे. ते संमेलन यशस्वी करण्याची प्रत्येक सोलापूरकरांची जबाबदारी आहे. हे पदाधिकारी केवळ नाममात्र आहेत. विभागीय नाट्यसंमेलन हे शंभरावं आहे. सोलापूरचं हे नाट्य संमेलन देशभरात गाजलं पाहिजे. नाट्य संमेलन कराव ते फक्त सोलापूरकरांनी करावं, असं संमेलन झालं पाहिजे. आम्हाला सार्थ अभिमान आहे. पुढच्या नाट्य संमेलनासाठीही सोलापूरचं नाव अभिनेत्यांनी सूचविलं पाहिजे, असंच काम सर्वांनी करावं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

नाट्य संमेलनाच्या कामात कोणीही मान पान घेऊ नये. हे काम माझं आणि माझ्या घरातील आहे, ते काम मला नावलौकिसास आणायचं आहे. ही माझी जबाबदारी आहे. कोणत्याही तक्रारी न करता, प्रत्येकाने नाट्य संमलनेला आलेल्या पाहुण्यांची अडचण सोडविण्याचे काम केले पाहिजे. नाट्य संमेलन यशस्वी करून एक चांगला संदेश सोलापुरातून संर्पूण महाराष्ट्रात द्यावा, असे आवाहनही माजी सहकार मंत्री देशमुख यांनी केले.

Subhash Deshmukh
Sanjay Raut On BJP: 'अयोध्येतील सोहळ्याचं निमंत्रण देणारं भाजप कोण ?'; संजय राऊतांनी सुनावलं

सुभाष देशमुख म्हणाले की, आम्ही नमो चषक आयोजित करण्याचे महाराष्ट्रातील भाजपच्या लोकांनी ठरवलं आहे. कला-क्रीडा क्षेत्रातील लोकांना प्रोत्साहन देण्याचे काम करणार आहेत. या चषकाच्या माध्यमातून सोलापूरमधील खेळाडू आणि कलाकर यांना मोदी यांच्याशी जोडण्याची एक संधी मिळणार आहे. सर्वात जास्त कलाकरांची नोंदणी सोलापुरात झाली पाहिजे. त्याची नोंद खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मधून घेतली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.

Subhash Deshmukh
Ajit Pawar in Ahmednagar : अजित पवारांची खेळी, जुना पत्ता काढला बाहेर; थोरातांच्या भाच्याला नियुक्तीपत्र..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com