Solapur News : सगळंच बारामतीला नेण्याची प्रथा सुरू केली काय? अन्न उत्कृष्टता केंद्रावरून सुभाष देशमुख आक्रमक

Food Excellence Center : अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला नेण्याचा निर्णय; सुभाष देशमुखांचा आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा
Subhash Deshmukh
Subhash Deshmukh Sarkarnama
Published on
Updated on

Solapur : राज्याच्या सत्तेत एकत्र आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूरचे श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला नेणे, योग्य नाही. भारतीय जनता पक्षाचा आमदार म्हणून माझा या निर्णयाला तीव्र विरोध आहे. कुठल्याही परिस्थिती आम्ही हे होऊ देणार नाही. आमदारकीचा राजीनामा देण्याची वेळ आली तर मी तो देईन. पण, हे केंद्र सोलापुरातून इतरत्र कुठेही जाऊ देणार नाही, असा इशारा आमदार सुभाष देशमुख यांनी दिला. (Decision to move Center of Food Excellence to Baramati; Deshmukh's warning to resign from MLA)

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्च २०२३ मध्ये मांडलेल्या अर्थसंकल्पात सोलापूर येथे श्री अन्न उत्कृष्टता केंद्र तथा मिलेट सेंटर मंजूर करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षानिमित्त सोलापूरला हे केंद्र राज्य सरकारकडून देण्यात आले होते. ते केंद्र आता बारामतीला हलविण्याचा शासन निर्णय शनिवारी प्रसिद्ध झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Subhash Deshmukh
Kamboj Offer To Raut : मोहित कंबोज यांची संजय राऊतांना ऑफर; ‘दुबईला जातोय, चला पार्टी करूया...’

दरम्यान, या घटनेवरून सोलापूर जिल्ह्यातील आमदार प्रचंड संतप्त झाले आहेत. दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेत या मुद्यावरून आमदारकीचा राजीनामा देण्याचा तयारी दर्शविली आहे. सगळंच बारामतीला घेऊन जाण्याची प्रथा काढली आहे का, असा सवाल त्यांनी केला आहे.

श्री अन्न उत्कृष्टता केंद्र अर्थात मिलेट सेंटर हे होटगी तलाव परिसरातील शासकीय जागेत सुरू करण्यात यावे, यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. सोलापूरचा हा प्रकल्प जर बारामती नेला जात असेल तर तो सोलापूरवर अन्याय आहे, अशी भावना जिल्ह्यातील नागरिकांची आहे. आम्ही हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत सोलापूरच्या बाहेर जाऊ देणार नाही. त्यासाठी आमदारकी पणाला लावण्याची माझी तयारी आहे, असेही आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले.

दरम्यान, अक्कलकोटचे आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी यासंदर्भात वेगळी भूमिका मांडली आहे. श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला हलविण्यात आलेले नाही. या योजनेत सहभागी असलेल्या कंपन्यांना प्रशिक्षण देण्याचे काम हे हैदराबाद येथील एक संस्था करते. या संस्थेच्या सोलापुरातील केंद्रात पुरेशी साधनसाम्रगी नाही, ती व्यवस्था बारामतीत येथे आहे. त्यामुळे केवळ प्रशिक्षणाचे काम बारामतीत होणार आहे. प्रकल्प सोलापुरातच राहणार आहे.

Subhash Deshmukh
Pandharpur Wari : फडणवीसांची कार्तिकी महापूजा यशस्वी करणारे पडद्यामागचे पाच शिलेदार...

खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनीही हा प्रकल्प बारामतीला नेण्यास विरोध दर्शविला आहे. आम्ही सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदार त्याला विरोध करू, असेही त्यांनी म्हटले आहे. मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांनीही यासंदर्भात आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच, सोलापूरसाठी मंजूर झालेला प्रकल्प आम्ही बाहेर जाऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Subhash Deshmukh
Obc Melava : वडेट्टीवारांचा 6 दिवसांतच ‘यू टर्न’; हजारो ओबीसींचे फोन आल्याचे सांगत भुजबळांसोबत एकत्र येण्याचा निर्णय

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com