Solapur Politic's : दोन मातब्बरांना डावलून भाजप सोलापुरातील ‘ज्युनिअर आमदारा’ला करणार मंत्री?

Assembly Election 2024 : राज्यात तीन पक्षांच्या नेत्यांमधील बैठकीनंतर मुख्यमंत्री निवडीसाठी दिल्लीत भाजप हायकमांकडे चर्चा होणार आहे. मुख्यमंंत्रिपद कोणाला याचा फैसला दिल्लीत होणार आहे.
Subhash Deshmukh-Vijaykumar Deshmukh-Sachin Kalyansheeti
Subhash Deshmukh-Vijaykumar Deshmukh-Sachin KalyansheetiSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 26 November : राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्रिपदाबरोबरच मंत्रिमंडळात कोणा कोणाला संधी मिळणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीतनंतर जोरदार कमबॅक करणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात भाजप किती मंत्रिपद देणार, याची उत्सुकता आहे. सोलापुरात दोन देशमुखांबरोबरच अक्कलकोटमधून दुसऱ्यांदा आमदार झालेले सचिन कल्याणशेट्टी यांचेही नाव आघाडीवर आहे. मात्र, पाचव्यांदा निवडून आलेले विजयकुमार देशमुख आणि विजयाची हॅट्‌ट्रीक साधणारे सुभाष देशमुख यांच्यापेक्षा कल्याणशेट्टींना हायकमांडकडून पसंती दिली जात असल्याची माहिती आहे.

विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र, मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. मुख्यमंत्री कोण होणार, याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहे. राज्यात तीन पक्षांच्या नेत्यांमधील बैठकीनंतर मुख्यमंत्री निवडीसाठी दिल्लीत भाजप हायकमांकडे चर्चा होणार आहे. मुख्यमंंत्रिपद कोणाला याचा फैसला दिल्लीत होणार आहे.

मुख्यमंत्रिपदाबरोबरच राज्यात मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता ताणली गेली आहे. सोलापूरमधून भाजपचे तब्बल पाच आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपला सोलापूरमध्ये (Solapur) एखादे तरी मंत्रिपद द्यावे लागणार आहे. तसेच, अनेक मातब्बर मंडळी भाजपकडून निवडून आलेली आहेत.

Subhash Deshmukh-Vijaykumar Deshmukh-Sachin Kalyansheeti
Solapur Assembly Election : सोलापुरातील चार मतदारसंघांत मतदानात तफावत; मतदानाचे आकडे अन्‌ मोजलेल्या मतांमध्ये फरक

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांनी काम केले आहे. मागील महायुती सरकारच्या काळात मात्र त्यांना स्थान मिळाले नव्हते. तसेच, गेल्या पाच वर्षांत सोलापूर स्थानिक पालकमंत्री मिळालेला नाही, त्यामुळे स्थानिक पालकमंत्री मिळावी, अशी येथील भाजप कार्यकर्त्यांसोबतच जनतेचीही इच्छा आहे.

मंत्रिपदासाठी सोलापुरातून भाजपचे सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख हे प्रबळ दावेदार आहेत. या शिवाय अक्कलकोटमधून दुसऱ्यांदा निवडून आलेले सचिन कल्याणशेट्टी यांचेही नाव आघाडीवर आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस नेमके कोणाला संधी देणार, याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. या तिघांशिवाय सोलापूरमध्ये समाधान आवताडे आणि देवेंद्र कोठे हे भाजपचे आमदार आहेत.

Subhash Deshmukh-Vijaykumar Deshmukh-Sachin Kalyansheeti
Narsayya Adam Master : आडम मास्तरांची मोठी घोषणा; निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती; पण कामगारांसाठी मरेपर्यंत रस्त्यावरची लढाई लढणार

दोन्ही देशमुख हे भाजपमध्ये ज्येष्ठ आहेत. या दोन्ही देशमुखांना डावलणे, भाजपला परवडणारे आहे का? आगामी महापालिका, नगरपालिका आणि इतर निवडणुका लक्षात घेता भाजप ज्येष्ठ आमदारांना डावलणार का?, हा खरा प्रश्न आहे. देवेंद्र कोठे हे फडणवीस यांच्या यंग ब्रिगेडमधील एक आमदार आहेत, त्यामुळे भाजप नेमकी कोणाला संधी देणार?, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com