Solapur Assembly Election : सोलापुरातील चार मतदारसंघांत मतदानात तफावत; मतदानाचे आकडे अन्‌ मोजलेल्या मतांमध्ये फरक

Assembly Election Final Result : सोलापूरच्या निवडणूक कार्यालयाने मात्र मानवी लेखनातील चुकीमुळे हा प्रकार झाल्याचे सांगून ही चूक संबंधित कर्मचाऱ्यांवर ढकलून दिली आहे, त्यामुळे मतांमधील तफावत हा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
Solapur Assembly Election
Solapur Assembly ElectionSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 26 November : सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, सोलापूर शहर मध्य आणि सोलापूर दक्षिण या चार मतदारसंघांतील मतांमध्ये तफावत आढळून आली आहे. मतदानाच्या दिवशी झालेले मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी मोजली गेलेली मते यात फरक आढळून आल्याने मतांच्या अंतराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

दुसरीकडे, सोलापूरच्या निवडणूक कार्यालयाने मात्र मानवी लेखनातील चुकीमुळे हा प्रकार झाल्याचे सांगून ही चूक संबंधित कर्मचाऱ्यांवर ढकलून दिली आहे, त्यामुळे मतांमधील तफावत हा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील करमाळा विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी दोन लाख 29 हजार 375 असे मतदान झाल्याची नोंद आहे. प्रत्यक्षात मतमोजणीच्या दिवशी मात्र दोन लाख 29 हजार 377 मतांची मोजणी झाली आहे, त्यामुळे करमाळ्यात दोन मतांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा निवडणूक कार्यालयाने करमाळा मतदारसंघातील (Karmala Constituency) वाढलेल्या मतांवर स्पष्टीकरण दिले आहे. त्यात 115 क्रमांकांच्या केंद्राच्या अध्यक्षांनी नमुना 17 सी मध्ये मतांचा हिशेब घेताना चुकीची नोंद घेतल्याचे म्हटले आहे. संबंधित केंद्राध्यक्षांच्या चुकीमुळे मतमोजणीच्या दिवशी मतांमध्ये तफावत आढळून आल्याचे अहवालात म्हटले आहे.

माढा मतदारसंघामध्ये (Madha Constituency) झालेले मतदान आणि मतमोजणी यात मोठ्या प्रमाणात मतांची घट झाल्याचे दिसून येत आहे. माढ्यात मतदानाच्या दिवशी दोन लाख 67 हजार 691 मतदान झाल्याची नोंद आहे. प्रत्यक्षात मतमोजणीच्या दिवशी मात्र दोन लाख 67 हजार 21 मतांचीच मोजणी झाली आहे, त्यामुळे माढ्यात तब्बल 670 मतांची घट झाल्याचे आढळून आले आहे.

Solapur Assembly Election
Narsayya Adam Master : आडम मास्तरांची मोठी घोषणा; निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती; पण कामगारांसाठी मरेपर्यंत रस्त्यावरची लढाई लढणार

माढ्यातील चुकीबाबतही केंद्रांध्यक्षांवर दोष ठेवण्यात आला आहे. मॉकपोल वेळी नोंदवलेली मते सीआरएस न केल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडील हस्तपुस्तिकामधील तरतुदीनुसार निवडून आलेल्या उमेदवारांच्या मतांची तफावत ही संबंधित केंद्रावर नोंदवण्यात आलेल्या मतांपेक्षा अधिक असल्यामुळे ही 670 मते मोजली नाहीत, असे स्पष्टीकरण निवडणूक कार्यालयाने दिले आहे.

सोलापूर शहर मध्य मतदारसंघातही दोन मतांची घट आढळून आली आहे. या मतदारसंघात दोन लाख 291 मतदान झाल्याची नोंद आहे, तथापि मतमोजणीच्या दिवशी दोन लाख 289 अशीच मते मोजल्याचे दिसून आले आहे, त्यामुळे या मतदारसंघात दोन मतांची घट आढळले आहे. या संदर्भात दैनंदिनीमध्ये दोन प्रदत्त मते ईव्हीएम मतांच्या हिशेबात गृहीत धरल्याने या दोन मतांची घट झाल्याचे निवडणूक कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सोलापूर दक्षिण मतदारसंघात मतदानाच्या दिवशी दोन लाख 23 हजार 624 असे मतदान झाल्याची नोंद आहे. प्रत्यक्षात मतमोजणीच्या दिवशी दोन लाख २३ हजार 625 मते मोजली गेली आहेत, यामध्ये एक मताची तफावत आढळून आली आहे. याबाबत केंद्राध्यक्षांनी इलेक्शन ड्यूटी सर्टिफिकेटचे मत गृहीत न धरल्यामुळे या ठिकाणी फरक आढळून आल्याचे म्हटले आहे.

Solapur Assembly Election
Solapur Assembly Election : सोलापुरात काँग्रेसचे नरोटे, काडादी, आडम मास्तरांसह 159 उमेदवारांचे डिपाॅझिट जप्त

दरम्यान, मतदानादिवशी झालेले मतदान आणि प्रत्यक्षात मोजलेली मते यातील तफावतीला निवडणूक कार्यालयाने संबंधित केंद्राच्या कर्मचाऱ्यांना जबाबदार धरले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com