Narsayya Adam Master : आडम मास्तरांची मोठी घोषणा; निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती; पण कामगारांसाठी मरेपर्यंत रस्त्यावरची लढाई लढणार

Adam Master Announces Retirement from Politics : माझं वय आता ऐंशीपर्यंत आलेले आहे. आता कुठंतरी थांबलं पाहिजे, या विचारातूनच मी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय मी घेतला आहे. मात्र, कामगारांची चळवळ मरेपर्यंत चालूच राहणार आहे.
Narsayya Adam Mastar
Narsayya Adam MastarSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 26 November : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र, कामगारांचे प्रश्न घेऊन मरेपर्यंत रस्त्यावरची लढाई लढली जाईल. रस्त्यावरची लढाई लढतच मरण पत्करेन, असेही माजी आमदार आडम यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सोलापूर शहर मध्य मतदारसंघाची (Solapur City Central Constituency) निवडणूक निर्भय आणि निस्पष वातावरणात झालेली नाही. तसेच ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार या मुद्यांवरून सोलापूर शहर मध्य मतदारसंघाची निवडणूक रद्द करण्यात यावी, यासाठी माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे जाहीर केले.

माजी आमदार आडम म्हणाले, निवडणुकीच्या राजकारणातून घेतलेली निवृत्तीचा निर्णय कोणत्याही परिस्थितीत अंमलात आणला जाईल. पण सोलापूरमधील (Solapur) कामगार, कष्टकऱ्यांची चळवळ यापुढच्या काळात चालू ठेवण्यासाठी नवं नेतृत्व उभं करण्यात येईल. आमच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात वारसदार नेमण्याची पद्धत नाही. हा काही संपत्ती वाटून घेण्याचा प्रकार नाही. जो चळवळीत पुढे जाईल, त्या माणसाला पक्षाचे नेतृत्व मिळेल.

माझं वय आता ऐंशीपर्यंत आलेले आहे. आता कुठंतरी थांबलं पाहिजे, या विचारातूनच मी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय मी घेतला आहे. मात्र, कामगारांची चळवळ मरेपर्यंत चालूच राहणार आहे, असेही आडम मास्तर यांनी स्पष्ट केले.

Narsayya Adam Mastar
Satara Politic's : साताऱ्यातील चार सुपुत्रांनी जिल्ह्याबाहेरील मतदारसंघातही फडकावला विजयाचा झेंडा!

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आडम मास्तरांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. काहीही करून आडम मास्तर यांना पाडा. हिंदू-मुस्लिम करून कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पाडण्यात आली, त्यामुळे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत माझा पराभव झाला, हा माझा प्राथमिक निष्कर्ष आहे, असेही आडम यांनी नमूद केले.

कामगार माझ्याकडे अजूनही रडत येतात, याचा अर्थ काय काढायचा. यावरून ‘ईव्हीएम’मध्ये गडबड असल्याच्या निष्कर्षांपर्यंत आम्ही आलेलो आहे. ‘ईव्हीएम’च्या संदर्भात आम्ही उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. त्यातून सोलापूर शहर मध्य मतदारसंघाची निवडणूक रद्द होईल. नव्याने निवडणुका लागतील आणि कोणीतरी आमचा माणूस उभा राहील आणि चमत्कार करून दाखवेल, अशी अपेक्षाही नरसय्या आडम यांनी बोलून दाखवली.

Narsayya Adam Mastar
Solapur Assembly Election : सोलापुरात काँग्रेसचे नरोटे, काडादी, आडम मास्तरांसह 159 उमेदवारांचे डिपाॅझिट जप्त

आडम मास्तर म्हणाले, मी हजारो लोकांना घरे मिळवून दिली आहेत. पण, तेवढीही मतं मला मिळताना दिसत नाहीत, याचं शल्य वाटण्याचे काही कारण नाही. कारण ते लोक म्हणतात की, आम्ही तुम्हालाच मतदान केलेले आहे. मग मतं गेली कुठे. हा संशोधनाचा विषय आहे, म्हणूनच आम्ही उच्च न्यायालयात जात आहोत. न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com