Rupali Chakankar Vs Rupali Thombre : आमदारकीवरून राष्ट्रवादीच्या दोन 'रूपाली' आमने सामने

Governor-appointed MLA : राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीची प्रक्रिया पुन्हा सुरू झाला आहे. येत्या १४ सप्टेंबरपर्यंत या निवडी होऊन शपथविधी होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Rupali Chakankar- Rupali Thombre
Rupali Chakankar- Rupali Thombre
Published on
Updated on

Pune, 05 September : राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, त्यांच्या नावाला पक्षातूनच विरोध होण्याची शक्यता आहे. चाकणकरांच्या नावावर रुपाली पाटील ठोंबरे यांनी आक्षेप घेत ‘एकाच महिलेकडे किती पदे देणार,’ असा सवाल विचारला आहे.

राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीची प्रक्रिया पुन्हा सुरू झाला आहे. येत्या १४ सप्टेंबरपर्यंत या निवडी होऊन शपथविधी होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. महायुतीमधील (Mahayuti) तीन पक्षांना या बारा जागा मिळणार आहेत. त्यात सर्वांत मोठ्या असलेल्या भाजपला सहा जागा, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) तीन जगा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar ), ठाण्याचे माजी आनंद परांजपे, मुंबई जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्या नावाची चर्चा आहे. या तिघांच्या नावाची शिफारस पक्षाकडून करण्यात आली आहे, असे सांगितले जात आहे. मात्र, त्या वरून पक्षाच्या महिला आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे.

Rupali Chakankar- Rupali Thombre
Anjali Damania : दमानियांच्या प्रश्नावर राष्ट्रवादीच्या मंत्र्याने हात जोडले; तर युवक अध्यक्ष म्हणतात, ‘मी त्यांच्यावर बोलणार नाही’

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांना पक्षातच विरोध होत असल्याचे पुढे आले आहे. पुण्याच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी चाकणकर यांच्या निवडीवर आक्षेप घेतला आहे. ‘एक व्यक्ती, एक पद’ या न्यायानुसार आमचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नक्की न्याय देतील, असा विश्वास आहे. एकाच महिलेला किती पदे देणार? असा सवाल त्यांनी चाकणकरांच्या संधीबाबत विचारला आहे.

कालपासून राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या निवडीसंदर्भातील बातमी वाचत आहे. बातमीची शहानिशा केली तर पक्षाने कोणतेही अधिकृत पत्र दिलेले नाही, असे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाला आमची कळकळीची विनंती असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये इतरही महिला आहेत, त्या सक्षमतेने, दमदार कामाने मोठ्या आहेत.

पक्षात कर्तुत्वान महिला खूप आहेत. त्या सक्षम आहेत. काम करणाऱ्या महिलांचा विचार करावा इतर महिलांनाही समान संधी द्यावी, अशी विनंती रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे.

Rupali Chakankar- Rupali Thombre
Pune Assembly Elections : राष्ट्रवादीतल्या फुटीतून पुणे जिल्हा काबीज करण्याचा काँग्रेसचा 'मास्टर प्लॅन'

रुपाली ठोंबरे पाटील यांच्या विरोधानंतर पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार काय निर्णय घेतात, हे पाहावे लागणार आहे. कारण, या नियुक्त्या ह्या वरिष्ठ सभागृहासाठी असणार आहेत. त्या निवडी करताना पक्षाला फार गंभीर्यपूर्वक विचार करावा लागणार आहे. त्या निवडी वादात अडकणार नाहीत, याची काळजी तीनही पक्षाला घ्यावी लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com