Sugar Mill Action : एफआरपी थकविणाऱ्या सोलापुरातील 6 कारखान्यांना दणका : महाडिक, साठे, काडादी, आवताडे, शिंदेंच्या कारखान्यांचा समावेश

Solapur Sugar Factory's News : शेतकऱ्यांच्या ऊस एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर साखर आयुक्तांकडून आरसीसी कारवाई सुरू आहे. राज्यातील 15 कारखान्यांवर कारवाई झाली असून त्यापैकी सहा कारखाने सोलापूर जिल्ह्यातील आहेत.
Sugar Factory
Sugar FactorySarkarnama
Published on
Updated on

Solapur, 22 August : शेतकऱ्यांच्या गाळप केलेल्या उसाची एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर साखर आयुक्तांकडून आरसीसीच्या कारवाईचा बडगा उगारला जात आहे. या कारवाईमध्ये सोलापूर जिल्ह्याचा क्रमांक वरचा आहे. कारण साखर आयुक्तांकडून आतापर्यंत राज्यातील 15 साखर कारखान्यांवर कारवाई झाली आहे, त्यातील सहा साखर कारखाने हे सोलापूर जिल्ह्यातील आहेत.

शेतकऱ्यांच्या उसाला गाळप झाल्यापासून 15 दिवसांत एफआरपीची रक्कम देणे सहकार कायद्यानुसार बंधनकारक आहे. मात्र, अनेक साखर कारखान्यांकडून त्याचे उल्लंघन केले जाते. शेतकऱ्यांना उसाचे बिल दिले जात नाही. त्यावर साखर आयुक्तांकडून आरसीसीची कारवाई केली जाते. मात्र, या कारवाईची अंमलबजावणी किती होते, हा मोठा प्रश्न आहे.

उसाची एफआरपी थकविल्याने आतापर्यंत साखर आयुक्तांनी 15 कारखान्यांवर आरसीसीची कारवाई केली आहे. पूर्वी दहा कारखान्यांवर ही कारवाई करण्यात आली होती. आता पुन्हा पाच कारखान्यांवर आरसीसीची कारवाई केली आहे. या पाचमध्ये सोलापूर जिल्ह्यातील दोन कारखान्यांचा समावेश आहे.

Sugar Factory
Rajendra Raut : सोसायटी सभासदत्वासाठी संघर्ष करणाऱ्या राजेंद्र राऊतांची सोलापूर ‘डीसीसी’तील एन्ट्री निश्चित

मागील महिन्यापर्यंत राज्यातील दत्ता शिंदे यांचा गोकुळ शुगर (धोत्री, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर), भाजप खासदार धनंजय महाडिक यांचा भीमा साखर कारखाना (टाकळी भीमा, ता. मोहोळ, जि. सोलापूर), माजी आमदार धनाजी साठे यांच्या श्री कुर्मदास सहकारी साखर कारखाना (माढा, जि. सोलापूर), कमलाभवानी ग्लोबल कारखाना (करमाळा, जि. सोलापूर) या चार साखर कारखान्यांवर आरसीसीची कारवाई करण्यात आली होती.

तसेच, भीमाशंकर शुगर (वाशी, जि. धाराशिव), विठ्ठलसाई सहकारी साखर (उमरगा, जि. धाराशिव), केदारेश्वर सहकारी साखर (अहिल्यानगर), एस. जे. शुगर डिस्टलरी (नाशिक), अष्टलक्षमी शुगर इथेनॉल (नाशिक), सचिन घायाळ शुगर (पैठण, छत्रपती संभाजीनगर) या सहा अशा एकूण १० साखर कारखान्यांवर अगोदरच आरआरसी कारवाई करण्यात आली आहे.

Sugar Factory
BJP Leader : मनोहरमामाशी आर्थिक संबंध ठेवणाऱ्या भाजप नेत्याच्या अडचणीत वाढ : पत्नीच्या अटकेनंतर शिक्षण संस्थेचीही तीन यंत्रणांकडून होणार चौकशी

दरम्यान, साखर आयुक्तांकडून नुकतेच पाच साखर कारखान्यांवर एफआरपी न दिल्यामुळे आरसीसीची कारवाई केली आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील भाजप आमदार समाधान आवताडेंच्या अवताडे शुगर, (मंगळवेढा, जि. सोलापूर), धर्मराज काडादी यांच्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना (सोलापूर), बोत्रे पाटील यांच्या ओंकार साखर कारखाना, युनिट नं. ८ (परळी वैजनाथ, बीड), रायगाव शुगर, (कडेगाव, सांगली), ग्रीन पॉवर शुगर, (खटाव, जि. सातारा) या चार कारखान्यांवर आरआरसी कारवाई करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com