BJP Leader : मनोहरमामाशी आर्थिक संबंध ठेवणाऱ्या भाजप नेत्याच्या अडचणीत वाढ : पत्नीच्या अटकेनंतर शिक्षण संस्थेचीही तीन यंत्रणांकडून होणार चौकशी

Ramdas Zhol News : भोंदू मनोहर भोसलेशी कथित आर्थिक हितसंबंधांप्रकरणी रामदास झोळ आणि माया झोळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. माया झोळ अटकेत असून संस्थेची तीन यंत्रणांकडून चौकशी होणार आहे.
Ramdas Zhol-Manohar Bhosale
Ramdas Zhol-Manohar BhosaleSarkarnama
Published on
Updated on

Karmala, 22 August : भोंदू मनोहर भोसलेशी आर्थिक हितसंबंध उघड झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते तथा दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ आणि सचिव माया झोळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. माया झोळ यांना अटक केली असून रामदास झोळ अद्याप फरारी आहेत. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विविध आणि विशेष पथकांची नियुक्ती केली आहे. दरम्यान, दत्तकला शिक्षण संस्थेची धर्मादाय आयुक्त, शिक्षण आणि प्राप्तीकर (आयकर) विभाग या तीनही यंत्रणांमार्फत चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली.

मनोहर भोसले आणि दत्तकला शिक्षण संस्थेचे आर्थिक हितसंबंध असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. मनोहर भोसले याच्याकडून मिळालेल्या कथित पैशांची विल्हेवाट दत्तकला शिक्षण संस्थेच्या माध्यमातून लावल्याचे आणि तपासादरम्यान संस्थेच्या कामकाजातील विविध बाबींमध्ये अनियमितता आढळून आली आहे. त्यामुळे धर्मादाय आयुक्त, शिक्षण विभाग आणि प्राप्तीकर विभाग या तीनही स्तरांवरील चौकशीमुळे संस्थेच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे.

मनोहर भोसले हा अनिष्ट प्रथा, महिलांवरील अत्याचार, बलात्कारासारखे गंभीर गुन्हे तसेच इतर विविध गुन्ह्यांप्रकरणी सध्या तुरुंगात आहे. त्याच्याशी संबंधित आर्थिक व्यवहारांच्या तपासातून दत्तकला शिक्षण संस्थेचा सहभाग निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Ramdas Zhol-Manohar Bhosale
Rahul Narwekar On Party Split : राहुल नार्वेकरांनी सांगितला पक्षफुटी टाळण्याचा रामबाण उपाय : म्हणाले, ‘कोणत्याही पक्षावर 'ती' वेळ येणार नाही...’

तिघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

तपासादरम्यान दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांचा मनोहर भोसले याच्या कथित अवैध पैशांची विल्हेवाट लावण्यात सहभाग असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणात मदत केल्याच्या आरोपावरून संस्थेतील राजेंद्र गोकुळ हुंबे याला ११ ऑगस्ट रोजी, तर लक्ष्मीकांत मन्मथ लिगाडे याला १३ ऑगस्ट रोजी अटक केली होती.

Ramdas Zhol-Manohar Bhosale
Western Maharashtra Politic's : भाजपच्या बैठकीत राष्ट्रवादी पुन्हा ‘टार्गेट’वर : पश्चिम महाराष्ट्रात जिल्हा बँकेपासून ‘पदवीधर-शिक्षक’साठी आक्रमक स्ट्रॅटेजी...

गुन्ह्याचा तपास सुरू असताना रामदास झोळ यांच्या पत्नी माया झोळ यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना १६ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. या तिघांचीही माढा न्यायालयाने १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com