Kolhapur News : दिवसेंदिवस गोड साखरेच्या कडू कहाण्या जगासमोर येत आहेत. गडहिंग्लजमधील अप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखाना गोडसाखर या नावाने ओळखला जातो. या कारखान्यात सुरू असलेल्या भोंगळ कारभारामुळे दिवसेंदिवस अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहे. अध्यक्ष प्रकाश शहापूरकर यांच्या मनमानी कारभारामुळे आठ ते दहा संचालकांनी राजीनामे दिल्यानंतर पुन्हा एकदा नवा मुद्दा समोर आला आहे.
कामगारांचे थकीत पगार, मनमानी कारभार यामुळे कारखाना धुळीस मिळण्याच्या दृष्टीने वाटचाल करत आहे. परिस्थितीत संचालकांनी ठाम भूमिका घेत पाच ऑगस्टपर्यंत सर्व मागण्या मान्य न झाल्यास सत्ताधारी संचालक अध्यक्ष प्रकाश शहापूरकर यांच्या घरी जाऊन त्यांच्या दारात भीक मागून आंदोलन करणार आहेत. दरम्यान, सत्ताधाऱ्यांमध्येच सुरू असलेल्या या घटनांमुळे गोडसाखर कारखान्यांमधील (Suagar Factory) वातावरण चांगलंच तापलं आहे.
गोड साखर कारखान्याच्या निवडणुकीत डॉ. शहापूरकर यांनी एकहाती सत्तेची मागणी करून 2021पासूनचा थकीत पगारासह सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा विश्वास कामगारांना दिला. यामुळे त्यांच्या पाठीशी खंबीर राहून त्यांच्या पॅनेलला निवडून आणण्यात सिंहाचा वाटा उचलला. तर कोल्हापूर जिल्हा बँकेकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी 55 रुपये कोटी कर्ज ही दिले. पण कामगारांचे पगार सोडून अध्यक्षानी कारखान्याची दुरुस्ती केली. यामध्येही मनमानी झाल्याचा आरोप संचालकांनी केला आहे.
स्थानिक कामगारांना पगार देण्याऐवजी बाहेरील कामगारांना वेळोवेळी पगार देत स्थानिक कामगारांवर अन्याय केला आहे. सध्या कारखान्यावर एकाधिकारशाही सुरू असून संचालकांनीही राजीनामे दिले आहेत.
कामगारांचे पगार थकल्याने कारखान्यातील साखरही कामगारांनी रोखली आहे. मात्र, त्या संदर्भात चर्चा करण्यास कोणीच तयारी घेत नसल्याने आता कामगार वर्ग ही आक्रमक झाला आहे.
येत्या पाच ऑगस्टपर्यंत याप्रकरणी कसलीच ठोस कार्यवाही जर झाली नाही तर त्यानंतर डॉ. शहापूरकर यांच्या कोल्हापुरातील घरासमोर भीक मांगो आंदोलन करण्याचा इशारा कामगारांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.