Sugarcane Price : कारखानदारांना नाही जमलं ते या पठ्ठ्याने केलं, शेट्टींच्या मागणीला दिली साद

Kolhapur Sugarcane Price Raju Shetti on Jaggery Company Decision : राज्यात ऊसदराचे आंदोलन पेटलेलं असताना एका कंपनीने मोठा निर्णय घेत राजू शेट्टींचं मन जिंकलं आहे...
kolhapur sugarcane price
kolhapur sugarcane priceSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन गेल्या दीड महिन्यापासून सुरू आहे. आंदोलन निर्णायक टप्प्यावर आले असताना शेतकरी संघटनेच्या मागणीला एका पठ्ठ्याने सकारात्मक प्रतिसाद देत मागणी पूर्ण केली आहे.

हातकणंगले मजले येथील भूधन फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. या गुऱ्हाळघराने उसाची पहिली उचल ३१५० रुपये व मागील हंगामातील १०० रुपयांची घोषणा करून कारखानदारांना चपराक दिली आहे. या निर्णयाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

kolhapur sugarcane price
Swabhimani Kolhapur Protest : आंदोलनाआधीच मध्यरात्री स्वाभिमानीच्या शिलेदाराला पोलिसांनी उचललं; 'तरीही महामार्ग रोखणारच..'

ऊसदरासाठी आंदोलन सुरू असताना उसाची पहिली उचल ३१५० रुपये व मागील हंगामातील १०० रुपयांची घोषणा मजले. ता. हातकणंगले येथील भूधन फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. या गुऱ्हाळघर कंपनीच्या संचालकांनी आज केली.

भूधन फार्मर प्रोड्युसर कंपनी मजले येथील तरुण शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन गुऱ्हाळघर सुरू केले आहे. या ठिकाणी गूळ पावडर व गुळाचे उत्पादन घेतले जाते. गतवर्षी तुटलेल्या उसाला या कंपनीने तालुक्यातील इतर कारखान्यांप्रमाणे २९०० रुपये प्रतिटन दर दिला आहे. या कंपनीकडून गुळापासून कोणतेही उपपदार्थ तयार होत नसतानाही त्यांनी २९०० रुपये व संघटनेच्या मागणीप्रमाणे १०० रुपये दर जाहीर केला आहे. तसेच या वर्षी गाळपास येणाऱ्या उसाला प्रतिटन ३१५० रुपये दर जाहीर केला आहे.

शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवू नका- राजू शेट्टी

गुऱ्हाळघराची रिकव्हरी ही १० टक्क्यांपर्यंत असते. हे लोक गूळ पावडर उत्पादन करून इतका दर देत आहेत, तर रात्रं-दिवस काबाडकष्ट करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात आपण किती माती कालवतोय, याचे आत्मपरीक्षण साखर कारखान्यांनी करावे, असा सल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कारखानदारांना दिला आहे.

kolhapur sugarcane price
Dilip Walse Patil - Shetti : "...म्हणून 'स्वाभिमानी'ने आंदोलन मागे घ्यावे!"; मंत्री वळसे पाटलांची शेट्टींना विनंती

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com