Swabhimani Sanghatana: 'स्वाभिमानी'चा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का; दोन माजी आमदार लावले गळाला!

Minchekar and Patil join Raju Shetty Swabhimani: मिणचेकर आणि पाटील हे कोणता निर्णय घेणार याकडे मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते.
Sujit Minchekar, Ulhas Patil
Sujit Minchekar, Ulhas PatilSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: राज्यातील सत्ता बदलामुळे उमेदवारीचा घोळ झाल्यानंतर अनेक विद्यमान आणि माजी आमदारांनी बंडाचे निशान फडकवले आहे. त्यातच कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला भगदाड पडले आहे. महाविकास आघाडीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील दोन विधानसभा मतदारसंघात उभी फूट पडली आहे.

या दोन मतदारसंघातील जागा काँग्रेसला गेल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन माजी आमदार 'स्वाभिमानी'च्या गळाला लागले आहेत. आज या दोघांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यानंतर त्यांचा 'स्वाभिमानी'त प्रवेश केला.

हातकणंगले विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीतून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेने दावा केला होता. मात्र विद्यमान आमदार काँग्रेसचे असल्याने ही जागा काँग्रेसला दिली. काँग्रेसकडून राजू बाबा आवळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर ठाकरेंचे शिवसेनेचे माजी आमदार मिणचेकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली आहे.

Sujit Minchekar, Ulhas Patil
Congress fifth candidate list : काँग्रेसने जाहीर केली पाचवी उमेदवार यादी; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात उमेदवार बदलला!

शिरोळ विधानसभा मतदारसंघात ही हीच परिस्थिती आहे. जागा वाटपात हा मतदारसंघ काँग्रेसने(Congress) जिंकला. त्या ठिकाणी गणपतराव पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आले. त्यामुळे दावा केलेले माजी आमदार उल्हास पाटील यांनी देखील बंडाचे निशाण फडकवत आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

दोन दिवसांपूर्वी त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. उमेदवारीनंतर डावल्याने उल्हास पाटील हे नाराज होते. मात्र मिणचेकर आणि पाटील हे कोणता निर्णय घेणार याकडे मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते.

Sujit Minchekar, Ulhas Patil
Nitin Raut vs BSP : ...म्हणून बहुजन समाज पार्टीमुळे वाढलं नितीन राऊतांचं टेन्शन?

गेल्या दोन दिवसांपासून उल्हास पाटील हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा मतदारसंघात होती.जर स्वाभिमानी शेतकरी संघटनेत जाण्याचा निर्णय उल्हास पाटील यांनी घेतला तर त्यांची घर वापसी म्हणावी लागेल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com