
Solapur, 21 July : राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर शहराच्या मेळाव्यात अध्यक्ष संतोष पवार यांनी जिल्हाध्यक्ष शहराच्या कामात ढवळाढवळ करत आहेत, अशी तक्रार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे केली होती. त्याबाबत तटकरे यांनी बोलताना संतोष पवार यांच्या खांद्यावर हात ठेवत तुम्ही काही खंत व्यक्त केली. त्याची योग्य ती नोंद मी घेतली आहे. सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीत पक्षाच्या संघटनेला विश्वासात घेऊनच उमेदवारीचा निर्णय घेतला जाईल. कोणाचीही ढवळाढवळ सहन करणार नाही, असा इशारा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. सोलापूर शहराच्या मेळाव्यात बोलताना अध्यक्ष संतोष पवार यांनी जिल्हाध्यक्ष (उमेश पाटील यांचे नाव न घेता) सोलापूर शहरात येऊन कार्यकर्त्यांना डिस्टर्ब करत आहेत. मुंबईला घेऊन जात आहेत, तुम्हाला पद द्यायला लावतो, असे सांगून शहराच्या कामकाजात हस्तक्षेप करत आहेत. त्यामुळे सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या कामात विस्कळितपणा आणला जात आहे, असा आरोप केला होता. त्यावर तटकरे यांनी पवारांना शब्द दिला आहे.
पूर्वी पक्षात तुम्हाला जो मान होता, तो आजही असेल, असे सांगून संतोष पवार (Santosh Pawar) यांच्या खांद्यावर हात ठेवत तुम्ही काही खंत व्यक्त केली. त्याची योग्य ती नोंद मी घेतली आहे. अलीकडच्या कालावधीत जे पदाधिकारी नेमले आहेत, त्यांचेही मूल्यमापन करेन. लगेच काही वेगळे करेन असं नाही. पण, मूल्यमापन निश्चितपणे करेन, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
ते म्हणाले, विधानसभेच्या यशानंतर राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. माजी आमदार, माजी खासदार, माजी महापौर व इतर प्रमुख नेते राष्ट्रवादीत सहभागी होत आहेत. अल्पसंख्याक समाजालाही राष्ट्रवादीकडून आपले संरक्षण होईल, असा विश्वास वाटत असल्याने तेही आपल्यासोबत मोठ्या संख्येने जोडले जात आहेत.
पक्षप्रवेश होत असले तरी संघटनेत शिस्त असली पाहिजे. जेथील पक्षप्रवेश असतील तेथील जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष यांना बोलावून घेऊन पक्षप्रवेश झाले पाहिजेत. अडचणीत काळात नव्हते; पण आता सत्ता आल्याने येत आहेत. अशा लोकांना पारखून घेऊन संघटनेला विश्वास घेऊन काम केले जाईल, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका येतील. वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी राजकीय समीकरणे आहेत. या निवडणुका कशा पद्धतीने लढवायाच्या. तुम्ही सांगाल ते आम्ही मान्य करू. या दौऱ्याचा सर्व तपशील मी अजित पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ यांना दौऱ्याचा तपशील देणार आहे. त्यांना पक्षाच्या कर्यकर्त्यांच्या मनात काय भावना आहेत, हे त्यांना समजले पाहिजे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार घेतील. पण, तुमच्यावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी आम्ही घेऊ. सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीत पक्षाच्या संघटनेला विश्वासात घेऊनच उमेदवाचा निर्णय घेतला जाईल. पण, महापालिकेच्या निवडणुकीत पहिल्या क्रमांकाचे स्थान राष्ट्रवादी काँग्रेसने मिळावावे, असा विश्वास व्यक्त करतो, असेही तटकरे यांनी नमूद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.