Supriya Sule News : येत्या काळात सुप्रिया सुळेही अजित पवारांसोबत येतील; शिंदे सरकारमधील मोठ्या मंत्र्याचा दावा

Deepak Kesarkar Big Statement : लोकसभेवरून आत्ताच बोलणे योग्य नाही.
Supriya Sule -Ajit pawar-Deepak Kesarkar
Supriya Sule -Ajit pawar-Deepak KesarkarSarkarnama

kolhapur News : आगामी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरु आहे. त्यावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मोठं विधान करत राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. लोकसभेवरून आत्ताच बोलणे योग्य नाही. कारण पुढच्या काळात सुप्रिया सुळे ह्यादेखील अजित पवारांच्या सोबत असू शकतील, असे केसरकर यांनी म्हटले आहे. (Supriya Sule also will come with Ajit pawar? Deepak Kesarkar)

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे आज (ता. ४ सप्टेंबर) एका शाळेच्या कार्यक्रमानिमित्त कोल्हापुरात आले हेाते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केसरकर यांनी मोठा दावा केला आहे.

Supriya Sule -Ajit pawar-Deepak Kesarkar
Maratha Reservation News : मुख्यमंत्री मराठ्यांसाठी आजचा सुवर्ण दिवस ठरवतील, कुणबीचा जीआर निघेल ; उपोषणकर्ते जरांगेंना विश्वास

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी खासदार सुप्रिया सुळे या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत एकत्र येतील, असा दावा केसरकर यांनी केला आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येतील, अशी चर्चा होती. ती पुन्हा सुरू होण्याची शक्यता केसरकर यांच्या विधानामुळे वर्तविली जात आहे.

Supriya Sule -Ajit pawar-Deepak Kesarkar
Nana Patole On Gadkari: ...तर नितीन गडकरी होतील पंतप्रधान, नानांनी सांगितला 'फाॅर्म्यूला' !

जालन्यामधील घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत आहेत. मराठा समाजाकडून तीव्र भावना व्यक्त होत आहेत. लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्याची आहे. त्यावर बोलताना शिक्षण मंत्री केसरकर म्हणाले की, राज्य सरकारने तत्काळ निर्णय घेत जिल्हा पोलिसप्रमुखांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. त्या ठिकाणी शैलेश बलकवडे यांची नियुक्ती केली आहे.

Supriya Sule -Ajit pawar-Deepak Kesarkar
Raj Thackeray In Jalna: लाठीमाराचे आदेश देणाऱ्यांना मराठवाडाबंदी करून टाका; राज ठाकरेंचा रोख कुणाकडे ?

मराठा समाज शांत व संयमी आहे. मराठा समाजातील कोण दगडफेक करणार नाही. दगडफेक करणारे बाहेरचे कोण आहेत, हे पाहण्यासाठी पोलिस चौकशी करत आहेत. आज बारा वाजता राज्य सरकारची प्रमुख नेत्यांशी बैठक आहे. आंदोलनाकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले नाही. त्यामुळे लवकरच त्यावर तोडगा निघेल, असा विश्वासही मंत्री केसरकर यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com